आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा मोठी मंडळे स्थापन करणार शाडू मातीची मूर्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - इको फ्रेंडली गणेशोत्सवात यंदा मोठ्या मंडळांना सहभागी करून घेतले जाणार आहे. यंदा सहा मोठी मंडळे शाडू मातीच्या ‘श्रीं’ची मूर्ती बसवणार आहे. सार्वजनिक गणेश महामंडळ यासाठी पुढाकार घेणार आहेत.

‘दिव्य मराठी’ने तीन वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सवावर भर दिलेला आहे. पीओपीच्या गणेशमूर्ती बसवण्यावर मोठ्या मंडळांचा कल असतो. त्यामुळे बर्‍याच मंडळांनी मोठ्या मूर्ती न बुडवता त्या वर्षभर सांभाळून ठेवल्या आहेत. यंदाही मोठ्या मूर्ती घेणार्‍या मंडळांना त्या मूर्ती विसर्जित न करता त्या वर्षभर सांभाळून ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. मंडळांच्या पदाधिकार्‍यांकडून मूर्तींची अदलाबदल करण्याचाही विषय पुढे आला होता.

‘दिव्य मराठी’च्या आवाहनाप्रमाणे सार्वजनिक गणेश महामंडळ यंदाही मंडळांना शाडू मातीच्या मूर्ती घेण्याचा आग्रह धरणार आहेत. यासाठी यंदाही महामंडळ मूर्तीदान करण्याचा उपक्रम हाती घेईल. विधवित स्थापना करण्यात येणारी मूर्ती लहान घेऊन इतर मोठी मूर्ती दान अथवा ती विसर्जित न करण्यावर भर असेल. यातून पाण्याचे प्रदूषण टळून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण
महात्मा गांधी वदि्यालयात शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण वदि्यार्थ्यांना देण्यात आले. हरीतसेना प्रमुख जी.बी. चव्हाण, कलाशिक्षक आर.पी. अत्तरदे यांनी मार्गदर्शन केले. निर्माल्य नदीत न टाकता एका ठिकाणी संकलित करण्याची शपथ वदि्यार्थ्यांना देण्यात आली.
सहा मंडळे तयार
महामंडळाने सहा गणेश मित्र मंडळांना शाडू मातीच्या छोट्या मूर्ती घेण्यास राजी केले आहे. यात पंचरत्न मंडळ, आदर्श मित्र मंडळ, उत्कर्ष मंडळ, दीपश्री मंडळ यासह दोन अन्य मंडळांचा समावेश आहे. अजून इतरही मंडळांना देखील छोट्या मूर्ती घेण्यासाठी जनजागृती महामंडळ करणार आहे.
उद्या पालिकेत बैठक
गणेशोत्सवाच्या तयारीसाठी शनविारी महापालिकेच्या अधिकार्‍यांसोबत सार्वजनिक महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. यात मेहरूण तलावावरील विसर्जन
ठिकाणासंदर्भात चर्चा, शहरातील मिरवणुकीचा मार्ग याविषयावर चर्चा केली जाणार आहे.
आज गणेशमूर्ती कार्यशाळा
आर.आर. वदि्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल यांच्यातर्फे शुक्रवारी सकाळी १० वाजता पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा होणार आहे. अविनाश लाठी अध्यक्षस्थानी असतील. अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, शिल्पकार अतुल मालखेडे उपस्थित राहतील. बन्सीलाल सुतार मार्गदर्शन करतील.