आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Economics Serves And Adhar Cards Information Got In Post Office

पोस्टात आर्थिक सेवा, आधार कार्डची माहिती मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - ‘डिजिटलइंडिया’ सप्ताह जुलैपासून सुरू आहे. सप्ताहांतर्गत पोस्टात जनचेतना दिवस, आर्थिक सेवेची ग्राहकांना माहिती देणे,आधार कार्ड लिंक करण्याच्या संदर्भात जनजागृतीवर भर दिला आहे.

शालेय विद्यार्थ्यांना पोस्ट विभागाला भेट देऊन दैनंदिन कामकाजाची माहिती दिली जात आहे. सप्ताहाची अंमलबजावणी पोस्ट विभागात सुरू आहे. यामध्ये जनचेतना दिवस, आर्थिक सेवेबाबत ग्राहकांना माहिती देणे, शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यालयात आणून पोस्ट खात्यातील कामकाजाची माहिती देणे, ई-दुनिया सेवेंतर्गत ग्राहकांचे आधार कार्ड लिंक करणे, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे अशा विविध योजनांची माहिती दिली जात आहे. विभागांतर्गत भुसावळ, चोपडा, जामनेर, बोदवड, रावेर, यावल, मुक्ताईनगर या सात तालुक्यांतील ३४ उप डाकघर ग्रामीण भागातील २०४ शाखा डाक घरांमध्ये सप्ताहाची अंमलबजावणी सुरू आहे. गेल्या चार दिवसांच्या कालावधीत हजार ७०० ग्राहकांचे पोस्टल लाइफ इन्श्युरन्स, ग्रामीण टपाल जीवन विमा योजना बचत खाते, विविध प्रकारचे सर्टिफिकेट्सचे आधार कार्ड लिंक करण्यात आले. सुकन्या योजनेत सहा महिन्यांच्या कालावधीत हजार ५०० नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. योजनेत इतर विभागांच्या तुलनेत भुसावळचा आलेख उंचावत असून हा विभाग दुस-या क्रमांकावर आहे, अशी माहिती उपविभागाचे डाक अधीक्षक पी.बी. सेलुकर, सहायक अधीक्षक एम.एम. पाटील यांनी दिली.
भुसावळ विभागांतर्गत येणा-या नशिराबाद डाक कार्यालयाला मंगळवारी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त येथील सर्वात जुन्या ग्राहकांचा कार्यक्रम घेऊन गौरव केला जाणार आहे.
पोस्टातील ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तसेच, नागरीकांनी ऑनलाइन खरेदी केल्यास पोस्टातर्फे घरपोच कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सुविधा मिळेल.

लाभ घ्यावा
ग्राहकांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आदेशानुसार आधार कार्ड लिंक करावे. शिवाय, इतर योजनांची माहिती जाणून लाभ घ्यावा. पी.बी.सेलुकर, डाक अधीक्षक, भुसावळ