आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रमशील शिक्षणाचा खजिना आता एका क्लिकवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आपल्या सर्जनशीलतेला विचारांना कृतीची जोड देत विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांतून सामान्य ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न बिलवाडी (ता.जळगाव) येथील जि.प.शिक्षक संदीप पाटील हे ब्लॉगच्या माध्यमातून करत आहेत. त्यांनी sandippatil1988.blogspot.com या नावाने ब्लॉग तयार केला आहे. या ब्लॉगमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सोप्या पद्धतीने तयारी करून घेता येणार आहे. या ब्लॉगचे जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या वेळी संतोष कोळी, पवन सोनवणे, रविकिरण बिऱ्हाडे, केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे, किरण पाटील आदी उपस्थित होते.

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालण्यासाठी वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, हे सर्व उपक्रम ग्रामीण भागापर्यंत पोहाेचत नसल्याने शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंतच मर्यादित असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यवाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकारण्यासाठी संकेतस्थळावर ब्लॉग बनवल्याचे पाटील सांगतात. हा ब्लॉग मोबाइल अथवा संगणकावर ओपन करता येत असल्याने शिक्षकांना शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेताना जास्त शोधाशोध करण्याची गरज भासणार नाही.

काय आहे ब्लॉगवर?
या ब्लॉगवर विविध उपक्रम, संगीतमय पाढे, कविता, राज्यातील उपक्रमशील शिक्षक त्यांच्या शाळा आदीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. याशिवाय ज्या समाजसुधारकांनी महाराष्ट्रात समाजसुधारणेचे कार्य केले आहे, त्यांच्या कार्याची जीवनचरित्राची माहितीही या ब्लॉगवर मिळते. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही एमपीएसी, यूपीएसी, नेट-सेट यासारख्या परीक्षांच्या तयारीची माहिती दिली आहे. तसेच विविध शैक्षणिक संकेतस्थळांच्या लिंकदेखील या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.

शाळेत कोणते उपक्रम राबवायचे त्या अंतर्गत कोणत्या कार्याचा समावेश राहील, याची संपूर्ण माहिती ब्लॉगवर आहे. तसेच पाढे, गाणी, व्हिडिओ, ऑडिओ बुक्स, मराठी बातम्या, बडबडगीते, सुविचार संग्रह आदी माहितीही दिली आहे. या ब्लॉगच्या निर्मितीसाठी दोन महिने लागले. - संदीप पाटील, शिक्षक
बातम्या आणखी आहेत...