आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणासाठी दत्तक घेतलेल्या मुलाला केले अधिकारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ : भुसावळ हायस्कूलच्या निवृत्त पर्यवेक्षिका मालती काेमलदास झांबरे यांनी एका बालकाला दत्तक घेतले हाेते. प्राथमिक, माध्यमिक, उच्चशिक्षणही त्यांनीच केले. सध्या हा मुलगा बीएसएनएलमध्ये वर्ग १ चा अधिकारी असून प्रमाेद सपकाळे असे त्याचे नाव अाहे. 
 
शहरातील विविध घटकांना प्रेरणा मिळावी म्हणून मालती झांबरे यांचा प्रज्ञासूर्य प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी (दि. ६) गाैरव करण्यात येणार अाहे. तेली समाज मंगल कार्यालयात सायंकाळी वाजता हा कार्यक्रम हाेईल. त्यांच्यासाेबतच डाॅ. रेखा कल्याणसिंग पाटील, शीतल जयेंद्र लेकुरवाळे, चंद्रभागाबाई कडू चाैधरी, मालती काेमलदास झांबरे यांचाही अादर्श सेवाकार्य करीत असल्याने गाैरव हाेणार अाहे.
 
कार्यक्रमासाठी अायाेजन समितीचे ३० सदस्य परिश्रम घेत अाहेत, असे अध्यक्ष डाॅ. राजेश मानवतकर, सचिव प्रा. जतीन मेढे, सहसचिव डाॅ. मधू मानवतकर यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी आयोजन समितीने सांगितले. 

-उपेक्षितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अाणण्यासाठी भुसावळातील चारचाैघींची धडपड 
-प्रज्ञासूर्य प्रतिष्ठानतर्फे अाज मालती झांबरेंचा हाेणार गाैरव, 
-मुंबईचे लाेककवी प्रा. प्रशांत माेरेंचे ‘अाई एक महाकाव्य’ विषयावर रंगणार व्याख्यान 
सविस्तर वाचा पुढील  स्लाईडवर... 
 
बातम्या आणखी आहेत...