आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळेत शिक्षणासह आरोग्याचीही काळजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: शाळेत शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सीबीएसई शाळेत नवीन शैक्षणिक वर्षापासून कोर्स सुरू केला जाणार आहे. यात विद्यार्थी शाळेतच जीममध्ये वेळ देऊ शकणार आहेत. तसेच शिक्षकांकडून व्यायामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
2012-13 या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या फिटनेससाठी हा कोर्स सुरू करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या कोर्सचे नाव ‘फिटनेस अँण्ड जीम ऑपरेशन’ आहे. या व्होकेशनल कोर्ससाठी मंडळाने सीबीएसई शाळांमधून अर्ज मागविले आहेत. अर्ज करणार्‍या शाळांना याच सत्रापासून कोर्स सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे. या कोर्सची सुरुवात अकरावीपासून होणार आहे. विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यापासून अर्ज करावेत, असे कळविण्यात आले आहे.
फिटनेस सेंटर आवश्यक
कोर्स सुरू करण्यासाठी शाळेत जीमसोबतच फिटनेस सेंटर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर फिटनेस ट्रेनिंगसाठी पदव्युत्तर फिजिकल टिचरची नेमणूक करणे अनिवार्य राहणार आहे.