आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Educational Material For Students, Latest News In Divay Marathi

सीएच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-गेल्या काही वर्षांमध्ये सी.ए. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍यांचे प्रमाण वाढले असले तरी दरवर्षी परीक्षा देणार्‍या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ती उत्तीर्ण होणार्‍यांचे प्रमाण अत्यल्प असल्याने ही टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा सी.ए. असोसिएशनतर्फे त्यांना मार्गदर्शन म्हणून शैक्षणिक साहित्य व ग्रंथालय उपलब्ध करून दिले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे घेण्यात येणारी सीएची परीक्षा मे अखेर तर सीपीटीची परीक्षा जूनमध्ये होणार आहे. दोन्ही मिळून यंदा जळगाव केंद्रावर 500 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेत 191 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातून आठ विद्यार्थी सीए झाले आहेत तर सीपीटी परीक्षेत जळगाव केंद्राचा 28 टक्के निकाल लागला. मागील काही वर्षांचा आढावा घेतला असता सीए होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र परीक्षा देणार्‍यांच्या तुलनेत उत्तीर्ण होणार्‍यांची टक्केवारी अजूनही कमीच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ही टक्केवारी वाढावी म्हणून सीए असोसिएशनतर्फे प्रय} केले जात आहेत.