आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल नेटवर्किंग साइटचे वाढते धोके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - सोशल नेटवर्किंग साइटमुळे तरुणीची आत्महत्या.. सोशल नेटवर्किंग साइटवर मैत्री करून गंडवले.. अभिनेत्रीचे फोटो मार्फिंग करून बदनामी.. सोशल नेटवर्किंग साइटवरून झाले रेव्ह पार्टीचे आयोजन.. या व अशा प्रकारच्या बातम्या सध्या रोजच कानावर येत आहेत. या सगळय़ा प्रकारांमागे किंवा या सर्व बाबींमागे फेसबुक व तत्सम सोशल नेटवर्किंग साइट असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. केवळ तरुणाईच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिक व अभ्यासू वर्गालाही फेसबुकने आपल्या जाळय़ात ओढण्यास सुरुवात केली असून, दिवसेंदिवस फेसबुकचे हे जाळे घट्ट होत असल्याचे चित्र आहे.

धुळय़ासारख्या ठिकाणीही फेसबुक वापरणारे जास्त आहेत. सायबर कॅफे, सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालये, बॅँका, कॉम्प्युटर क्लासेस इ. ठिकाणी फेसबुकचा सर्रास वापर होताना दिसतो. सोशल अँक्टिव्हिटीज्साठी व दूरवर असलेल्या मित्र-आप्तेष्टांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी चॅट करण्यासाठी आणि आपल्या भावनांचे आदानप्रदान करण्यासाठी ही वेबसाइट उपयुक्त असली तरी, तिचा सद्यस्थितीत मोठय़ा प्रमाणावर गैरवापर होत आहे. अशा साइटवर पोर्न व्हिडिओ वा ईल चित्रांमुळे शाळकरी विद्यार्थ्यांवर व महाविद्यालयीन तरुण-तरुणींवर दुष्परिणाम होत असल्याचे चित्र आहे. अभ्यासाच्या नावाखाली दिवसातून दहा ते बारा तास अशा साइटवर चॅटिंग करणारे महाभागही आहेत.

फेसबुकवरून मैत्री करणे, मोबाइल नंबरच्या आदानप्रदानातून बोलणे, लव्हशिप, रिलेशनशिपसारखे प्रकार वाढत चालले आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्येही हे लोण वेगाने पसरत असून, प्राचार्यांसह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्या ठिकाणी संगणक उपलब्ध आहे, अशा ठिकाणी अथवा रिकाम्या वेळेत फेसबुक हाताळताना दिसतात. जवळपास आता सर्वांचेच प्रोफाइल फेसबुकवर दिसू लागले आहे. दरम्यान, नवीन हायफाय मोबाइलमध्येही फेसबुक अँप्लिकेशन इनबिल्ट असल्याने ते सर्रास वापरले जाते. फोटो अपलोड करण्याच्या सुविधेचा वापर करत अनेक जण आपले पर्सनल फोटोही फेसबुकच्या माध्यमातून अपलोड करीत असतात. अशा फोटोंचा वापर गुन्ह्यांसाठी केला जातो व त्यातून बदनामी करणे, अपहरणासारखे गुन्हे घडताना दिसतात. दरम्यान, असले प्रकार रोखण्यासाठी काही नियम बनवण्याची गरज आहे.
फेसबुकचे व्यसन - सध्या महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांनाही फेसबुकचे व्यसन लागल्याचे दिसते. ज्या ठिकाणी आई-वडील असे दोन्हीही नोकरदार आहेत व जेथे संगणक आणि इंटरनेट जोडणी आहे, त्या ठिकाणी मुले तासन्तास फेसबुक वापरताना दिसतात. त्यातून ईल व्हिडिओ पाहणे, चॅटिंग, टॅगिंग, शेअरिंग या गोष्टी केल्या जातात. तसेच मोबाइलमध्ये 24 तास फेसबुक ऑन असल्याने वारंवार त्याचा वापर केला जातो.
एका व्यक्तीचे अनेक प्रोफाइल - फेसबुकवर एकाच व्यक्तीचे एकापेक्षा जास्त प्रोफाइल असतात. त्याचा वापर गुन्हय़ांसाठी केला जातो. या फेक अकाउंटच्या माध्यमातून चकवा देण्याचे काम केले जाते. तसेच मुलींची फसवणूक अशा अकाउंटच्या माध्यमातून घडतात. संपूर्ण जगात 83 मिलियनपेक्षा जास्त फेक अकाउंट असल्याची माहिती इंटरनेटवर आहे.

सेन्सॉर लागू होण्याची गरज - सोशल नेटवर्किंग साइट्सना सेन्सॉर लागू करण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर तयार करण्यात आले पाहिजे. याशिवाय लोकांमध्ये जनजागृती वापर करण्याबाबत जागृती झाल्यास गैरप्रकारांना निश्चितच आळा बसेल अँड.डॉ.साजेदा शेख, धुळे
चांगल्या वापराकडे दुर्लक्ष - फेसबुक हे जुने मित्र शोधण्याचे, आपल्या भावना व्यक्त करण्याचे व प्रबोधनाचे उत्तम साधन असले तरी, त्याचा चांगल्या रीतीने वापर फारच कमी प्रमाणात केला जातो. या साइटवर जातीय दंगली भडकवतील अशी चित्रे, धार्मिक कॉमेंट्स, छायाचित्रे, भावना दुखावणारे विषय मोठय़ा प्रमाणावर हाताळले जात असल्याने दिवसेंदिवस अशा साइट धोकादायक बनत आहेत. आसाम दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या दंगलीमुळे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनीही या साइटवर बंदी घालण्यासाठी केंद्राला सूचना करणार असल्याचे दोनच दिवसांपूर्वी सांगितले आहे.