आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीची चाहूल अन् भाजीपाला महागल्याने अंडे विक्री वाढली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - थंडीची चाहूल लागताच जळगाव शहरात अंड्यांचा खप दुप्पट वाढला आहे. धावपळीच्या जीवनात त्वरित ब्रेकफास्टसाठी ऑम्लेट, भुर्जीला अधिक पसंती दिली जाते. शरीराची झीज भरून काढण्यासाठी अाणि विशेष करून थंडीच्या दिवसांमध्ये डॉक्टरदेखील अंडी खाण्याचा सल्ला देत असतात. शरीरास उपयुक्त असणारी अंडी अबालवृद्धासोबतच आजारी व्यक्तींसाठीही उपयुक्त असतात. शिवाय भाजीपाला महाग झाल्यामुळेही शहरात अंड्यांची विक्रीही वाढली आहे.
 
अन्य शहरांच्या आणि लोकसंख्येच्या तुलनेत जळगावमध्ये अंड्यांचा खप चांगला असून शहरात होलसेलची ते १० मोठी दुकाने आहेत. जळगावात इतर ऋतूत १८ ते २० हजार अंड्यांचा खप होतो; हाच खप हिवाळा सुरू होताच दुपटीने म्हणजे दरदिवशी सुमारे ४० ते ५० हजार एवढा वाढतो. होलसेल अंड्यांची मागणी आणि पुरवठा पाहून नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटी अंड्यांचा दर ठरवते. जळगावात शहरात जी अंडी येतात ती मुख्यत्वे करून धुळे जिल्ह्यातील मुकटी या गावातील पोल्ट्री फॉर्म येथून येत असतात. सध्या हिवाळा असल्याने अंड्यांच्या व्यवसायातून शहरातून दररोज दोन ते पावणे दोन लाख रुपयांची उलाढाल होत आहे. सध्या शेकडा ४४५ रुपये दराने अंडी विकली जात आहेत.

गावठी अंड्ड्यांमधून फसवणूक
गावठीअंड्ड्यांना मोठी मागणी आहे. ती अधिक पौष्टिक असल्याने ती खाण्याकडे खवय्यांचा कल असतो. मात्र, जळगावमध्ये ती दाखल होण्याचे दैनंदिन सरासरी प्रमाण साधारणपणे अतिशय अत्यल्प इतके आहे. गावठी अंडे यांना असलेल्या मागणीमुळे, तसेच मागणी आणि पुरवठ्यातल्या व्यस्त तफावतीमुळे काही विक्रेते इंग्रजी अंड्ड्यांनाच चहाच्या पाण्यात बुडवून त्याला गावठी अंड्ड्यांसारखा रंग देऊन ग्राहकांची फसवणूक करतात, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.
 
१० रुपये प्रतिनग गावठी अंडे
या वर्षी झालेल्या बेमोसमी पावसामुळे पालेभाज्यांचे उत्पन्न तेवढ्या प्रमाणात निघाल्याने पालेभाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यात कांदा ४० रुपये किलो, कोथिंबीर २० रुपये छटाक मिळत आहे. अशीच दरवाढ इतर भाज्यांच्या विक्रीत झाल्याने त्याचा फायदा अंड्यांच्या विक्रीवर झाला आहे. थंडीत जशी अंड्यांना मागणी वाढते; अशी वाढ भाज्यांचे दर वाढल्यावरही होते. भाज्या दरवाढीचा फायदा अंड्यांना होतो, असे अंडे व्यावसायिकांचे निरीक्षण आहे.
 
बातम्या आणखी आहेत...