आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय जीवनात अहंकारी वृत्ती नकाे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - राजकीय,सामाजिक कार्य करताना अहंकाराची भाषा वाढत चालली अाहे. अशी अहंकार वृत्ती असायला नकाे. रंजल्या-गांजल्यांकडे पाहिले तर अहंकार गळून पडताे, असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चाळीसगावी केले.

अपंग मेळावा, स्वयंदीप प्रशिक्षण स्वयंराेजगार कार्यशाळेचे उद््घाटन त्यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी ते बाेलत हाेते. प्रमुख अतिथी जलसंपदामंत्री गिरीश महाजन हाेते. व्यासपीठावर महाबळेश्वर येथील अपंग संस्थेचे प्रमुख भावेश नीता भाटिया, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, अचलपूरचे अामदार बच्चू कडू, अामदार हरिभाऊ जावळे, अामदार जयकुमार रावल, अामदार उन्मेष पाटील, अामदार स्मिता वाघ, व्यापारी असाेसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, चंद्रकांत पाटील पुढे म्हणले की, शाहू महाराजांनी अारक्षणासाठी त्या काळी पुढाकार घेतला. त्यांचाच अादर्श घेऊन राज्य सरकारची वाटचाल सुरू अाहे. स्वयंदीपसारख्या अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थांना शासन सदैव सहकार्य करेल. महत्त्वाचे काम असताना कार्यक्रमास अालाे. या कार्यक्रमास अालाे नसताे तर पश्चाताप झाला असता, असे त्यांनी सांगितले.

३५ हजार गावांत विकासक्रांती
अामदारउन्मेष पाटील यांच्या पुढाकारातून समाधान शिबिरात ५१ हजार दाखले वाटपाचा शुभारंभ सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाला. भारतीय जनता पक्षाचे शासन रयतेचे शासन असून वर्षांत ३५ हजार गावांत विविध कल्याणकारी योजना राबवून शासनाच्या माध्यमातून विकासक्रांती घडवण्यासाठी अाराखडा तयार असल्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...