आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईद-ए-मिलादनिमित्त जळगावमध्‍ये जुलूस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ईद-ए-मिलाद निमित्तरविवारी शहरात मुस्लिम बांधवांतर्फे विविध कार्यक्रम झाले. तसेच सुन्नी जामा मशीद येथून मिरवणूक काढण्यात आली होती. बऱ्हाणपूर येथील अबुबकर मियांॅ यांनी नेतृत्व केले. भिलपुरा चौक, घाणेकर चौक, सुभाष चौक या मार्गाने मिरवणुकीने मार्गक्रमण केले. जिल्हा पोलिस दलातर्फे मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. तेथे अजान देण्यात आली. या मिरवणुकीत १५ हजार सुन्नी मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता. या वेळी अयाज अली, मौलाना फरीद नदवी, अप्पर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत बच्छाव, मौलाना शेर मोहंमद खान, मौलाना नजम-उल-हक, जुबेर आलम, राकिब आलम, रफिक रज्वी, हनिफ रजा, युसूफ अली, रईस चांद आदी उपस्थित होते.
मिठाईवाटप :कादरिया फाउंडेशनतर्फे कादरी चौक गांधी मार्केट येथे मिठाई वाटप करण्यात आले. या वेळी हिंदू -मुस्लिम एकात्मतेवर मनोगत व्यक्त करण्यात आले. प्रेषित मोहंमद पैगंबर(स.) यांनी जगाला शांतीचा ‘जियो और जीने दो’चा संदेश दिला, असे फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख कादरी यांनी सांगितले. याप्रसंगी आसिफ रिझवी, शफी नुरी, शेख आदिल, शेख जुबेर रंगरेज, वसीम शेख, वसीम खान, अयाज खान, शेख हुसेफ कादरी आदी उपस्थित होते.