आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीच्या अाठ चारचाकी मूळ मालकांना परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - स्थानिकगुन्हे शाखेच्या पथकाने २८ जुलै रोजी अमळनेर तालुक्यातील मेहेरगावचा पोलिस पाटील किशोर पिरन पाटील आणि त्याचा चुलत भाऊ भूषण भीमराव पाटील यांना अटक करून त्याच्याकडून चोरीच्या ३१ चारचाकी जप्त केल्या होत्या. महिनाभरात पोलिसांनी तपास करून यापैकी १८ वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेतला आहे. यातील १८ वाहने मुंबई उपनगरातील असल्यामुळे त्या रवाना करण्यात आल्या अाहेत. त्यातील चारचाकी मूळ मालकांना मिळाल्या.

एकाच वेळी ३१ वाहने पकडण्याची मोठी कारवाई एलसीबीने केली होती. वाहने पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मागच्या बाजूला उभ्या केल्या होत्या. त्यामुळे जागेची मोठी अडचण निर्माण झाली होती. वाहने जप्त केल्यानंतर खरा तपास सुरू झाला होता. मुंबईतील काही चोरट्यांचा यात सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर आणखी एकाला अटक केली होती. आरटीओ विभागाच्या मदतीने पोलिसांनी मूळ मालकांचा शोध घेतला. व्हाॅट्स अॅपच्या माध्यमातून राज्यभरात या चारचाकींची माहिती पोहाेचवली. त्यामुळे ज्यांच्या चारचाकी चोरीला गेल्या होत्या, अशा लोकांनी पोलिसांशी संपर्क साधून जळगावात येऊन आपापल्या चारचाकींची ओळख पटवून घेतली. अद्याप १३ वाहनांचा तपास सुरू आहे.
अटकेत असलेले आरोपी सध्या कोपरखैरने पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांनी मुंबई उपनगरातील चोरलेल्या असल्यामुळे संबंधित फिर्यादींनी जळगावात येऊन वाहने ओळखली आहेत. आता या सर्व ठाण्यांमध्ये आरोपींना अटक दाखवून त्यांच्याकडून वाहने जप्त केल्याची कारवाई करून न्यायालयाच्या आदेशाने वाहने परत देण्यात येत आहेत. यासाठी ज्या पोलिस ठाण्यांना अद्याप आरोपी उपलब्ध झाले नाहीत ते अारोपींच्या अटकेच्या प्रतीक्षेत आहेत.

ही वाहने दिली मूळ मालकांना
पंतनगरपोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्वीफ्ट डिझायर (एमएच 06 एएल 9786), मेघवाडी पोलिस ठाणे- तवेरा(एमएच 04 इएस 9386), एनएम जोशी मार्ग पोलिस ठाणे- तवेरा (एमएच 04 इएस 7593), दहिसर पोलिस ठाणे - तवेरा (एमएच 04 इएस 9390), दहिसर पाेिलस ठाणे- तवेरा (जीजे 03 इआर 3047), घाटकोपर पाेलिस ठाणे - तवेरा (एमएच 04 इएस 9936), विलेपार्ले पोलिस ठाणे - तवेरा (एमएच 04 एफएफ 4315) आणि कोपरखैर ठाणे - स्वीफ्ट डिझायर (एमएच 04 डीडब्ल्यू 9456).