आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाठ मनपा रुग्णालयांचा कायापालट हाेणार, ८८ लाखांच्या कामांना मंजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाच लाख लाेकसंख्येच्या जळगाव शहरात सर्व साेयींयुक्त दवाखान्यांची नितांत गरज व्यक्त हाेत असल्याने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून याबाबत मदतीचे अाश्वासन दिले अाहे. त्यातच पालिकेच्या अाठही रुग्णालयांमधील लहान-माेठ्या कामांचा मार्ग माेकळा झाला अाहे. शासनाने पालिकेकडून मागवलेल्या ८८ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात हाेणार अाहे.

सध्या पालिकेच्या रुग्णालयांची अवस्था अत्यंत खराब अाहे. नागरिकांना साफसफाईपासून ते उपचारापर्यंत सर्वच बाबींसाठी झगडावे लागत अाहे. काेट्यवधी रुपयांच्या इमारती असतानाही त्यांचा अाराेग्यसेवेसाठी पुरेसा वापर हाेत नसल्याची अाेरड अाहे.

रुग्णालयांच्या इमारती झालेल्या दुर्लक्षामुळे अत्यंत खराब झाल्या असून, त्या काही ठिकाणी धाेकादायक ठरत अाहेत; परंतु अाता शासनाच्या अादेशामुळे नागरिकांना माेठा दिलासा मिळणार असून, रुग्णालयांना नवा लूक मिळणार अाहे. त्यात नवीन बांधकामांसाेबत नव्याने फरशी बसवणे, भिंतींचे सीलिंगचे प्लास्टर करणे, रंगरंगाेटी करणे, दरवाजे बसवणे, इलेक्ट्रिक फिटिंग यासारख्या लहान-माेठ्या कामांचा समावेश असेल.

लवकरच निविदा काढणार
रुग्णालयांच्यादुरुस्तीसाठी महापालिकेकडून लवकरच निविदा काढण्यात येणार अाहेत. तीन वर्षांपूर्वी शिवाजीनगरातील रुग्णालयाची दुरुस्ती केली हाेती. मात्र, गेल्या बऱ्याच वर्षांत प्रथमच एवढ्या माेठ्या प्रमाणावर रुग्णालयांची दुरुस्ती हाेत अाहे.

ही अाहेत रुग्णालये कंसात मंजूर निधी
कै.डी.बी.जैन रुग्णालय, शिवाजीनगर (१६ लाख २३ हजार), ग.माे.मुलतानी दवाखाना (९ लाख ८० हजार), पिंप्राळा-हुडकाे घरकुल अाराेग्य केंद्र (३ लाख २३ हजार), माे.युसूफ अायुर्वेदिक दवाखाना (३ लाख ५८ हजार), छत्रपती शाहू महाराज रुग्णालय (१९ लाख २० हजार), कै.भिकमचंद जैन हाॅस्पिटल, शिवाजीनगर (२ लाख ५१ हजार), कै.चेतनदास रुग्णालय (१६ लाख ६० हजार) कै.नानीबाई मेहता रुग्णालय (१७ लाख हजार रुपये).
बातम्या आणखी आहेत...