आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Eight Police Officer Transfer At Dhule, North Maharashtra, Khandesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळयाच्या आठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे: जिल्हा पोलिस दलातील कर्मचार्‍यांच्या विनंती अर्जावरून बदल्या केल्यानंतर आता सुमारे सात अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त चाळीसगाव येथील अधिकारी धुळयात रुजू होणार आहेत. बदली झालेल्या एकूण आठ अधिकार्‍यांमध्ये पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील 249 पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांबाबत पोलिस गोटात चर्चा सुरू असताना वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलिस अधिकार्‍यांचा बदल्या करण्यात आल्या आहेत. मोहाडी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांची जिल्हा वाचक शाखेत बदली करण्यात आली आहे. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन निकुंभ आणि अशोक महिरे यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातील उपनिरीक्षक सलीम अब्दुल राजे यांची धुळे तालुका पोलिस ठाण्यात, साक्री येथील सहायक पोलिस निरीक्षक गांगुर्डे यांची पिंपळनेरला देवपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप नेरकर यांची धुळे तालुका पोलिस ठाण्यात तर शिंदखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान यांची जळगाव जिल्ह्यात बदली झाली आहे.
चाळीसगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांची धुळयात बदली झाली आहे. तथापि त्यांच्या पोलिस ठाण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अकिल शेख यांची सुमारे आठ दिवसांपूर्वीच नाशिक येथे बदली झाली आहे. रिक्त झालेल्या पदांवर अद्याप कोणत्याही अधिकार्‍याच्या नियुक्तीचे कायदेशीर आदेश प्राप्त झालेले नाहीत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.