आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर अाेवेसीने पािकस्तानमध्ये राहावे, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शेकडाे निष्पापांचा जीव घेणारा याकूब मेमन दहशतवादी अाहे. त्याच्याविषयी अात्मीयता दाखवणे, त्याचा बचाव करणे हे कृत्य दहशतवादाला मदत करणारेच अन् देशद्राेहींचे समर्थन करणारे अाहे. भारतात राहून अाेवेसींनी निरर्थक बडबड करणे, पाकिस्तानच्या घाेषणा देणे, हे कृत्यही देशद्राेहीच अाहे, ते अाम्ही सहन करणार नाही. याबाबत एवढा पुळका असेल तर अाेवेसींनी पाकिस्तानात जाऊन राहावे, असा इशारा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी दिला.

मेमन हा दहशतवादी अाहे, तीच त्याची जात अाणि धर्म अाहे. त्याला इतर धर्मांशी जाेडू नये, त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली असून या शिक्षेविराेधात बाेलणे म्हणजे न्यायव्यवस्थेचा अवमान करणे हाेय. याकूबचा बचाव म्हणजेच दहशतवाद्याची मदत असून ताे देशद्राेह अाहे. भारतात राहून काही लाेक पाकिस्तान जिंदाबादच्या घाेषणा देत अाहेत. हे कदापि सहन केले जाणार नाही. त्यांना हवे तर त्यांनी पाकिस्तानात जाऊन राहावे, असा स्पष्ट इशारा खडसे यांनी दिला.