आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी एकनाथ डवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नाशिक विभागाचे अायुक्त एकनाथ डवले यांचे नाव निश्चित झाले अाहे. गुरुवारी डवले यांना यासंदर्भातले पत्र मिळाले. विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डाॅ.सुधीर मेश्राम यांचा कार्यकाळ सप्टेंबर राेजी पूर्ण हाेत अाहे. नवीन कुलगुरूंच्या निवडीस अजून महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता अाहे. त्यामुळे प्रभारी कुलगुरूपदाची सूत्रे अायुक्त एकनाथ डवले यांच्याकडे गेली. धडाडीचे अधिकारी म्हणून डवले यांची अाेळख अाहे. बुधवारी ते सूत्रे घेण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...