आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसे-सुरेश जैन तब्बल सहा वर्षांनी एकत्र; एकमेकांना खाऊ घातली \'मिरची\' भजी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर शहरातील मेहरूण तलावावर आयोजित करण्यात आलेल्या राजकीय भजी महोत्सवात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि सुरेश जैन हे राजकीय दिग्गज तब्बल सहा वर्षानंतर एकत्र आले. विविध प्रकारच्या भज्यांचा आस्वाद घेत दोघांनीही एकमेकांना भजी भरवली. आमदार खडसेंनी माजी आमदार जैन यांना मिरचीच्या भज्यांसह स्वत:च्या शेतातील आलेली खारीक आणि सिडलेस जांभुळ खायला दिले. खडसेंची मिरची आवड ही स्वभानुरूप असल्याचा चिमटा काढत माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनीही महोत्सावात सहभाग घेतला.

जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय हाडवैरी असलेले तीनही राजकीय दिग्गज रविवारी सायंकाळी मेहरूण तलावावर एकत्र आले होते. मराठी परिषदेने तलावाच्या काठी आयोजित केलेल्या भजी महोत्सवात माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी आमदार सुरेश जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे एकत्र आले होते. एकाच टेबलवरून या राजकीय दिग्गजांनी विविध प्रकारच्या भज्यांचा आस्वाद घेत चर्चा केली. यापूर्वी खडसे-जैन ऑगस्ट 2011 मध्ये तलावावरच फोटोग्राफी डे निमित्त एकत्र आले होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांचे कॅमेऱ्याने फोटो काढले होते. त्यानंतर सहा वर्षात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर दोन्ही दिग्गज पुन्हा एकत्र आले. मेहरूणच्या काठी सायंकाळी 5.30 वाजता सूर्य मावळीतला आला असतांना तलावातील शीतल, संथ पाण्याकडे बघत दोन्ही दिग्गज एकाच टेबलवर एकमेकांना भजी भरवित असल्याचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याने गुरूपौर्णिमेचा ‘राजकीय भजी महोत्सव’ जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरला.

या महोत्सवात आमदार एकनाथ खडसे यांनी आवडीनुसार मिरचीचे भजे तर सुरेश जैन यांनी बटाटे, कांदा मिक्स भजी खाणे पसंत केले. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी तब्बेतीला मानवणार नसल्याचे कारण देत भजी खाण्यास नकार देत काहीसे अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला.  

पुढील स्लाइडवर वाचा...खाऊ नये मिरची भजी.. अन् पिकला हाशा...

 
बातम्या आणखी आहेत...