आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसे रमले साेशल मीडियावर; राजकारण, मनाेरंजन, पाेस्टमधून अपडेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पक्षांतर्गत राजकारणाचा बळी ठरलेले माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या निर्णय प्रक्रियेपासून लांब अाहेत. तब्बल १२ खात्यांचा भार अचानक कमी झाल्याने माजी मंत्री खडसे सध्या साेशल मीडियावर रमले अाहेत. राजकीय घडामाेडी, मनाेरंजनासह सर्वच अाघाड्यांवर ते पूर्वी इतकेच अपडेट अाहेत. बुधवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालकांच्या बैठकीसाठी अाले असताना खडसे मोबाइल हाताळण्यात मग्न हाेते. पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी ‘व्हाॅट्सअॅपवर त्यांना अालेली ‘एकमेकांना जिरवण्यात भाजपच जिरणार’ ही पाेस्ट एेकवली.

भाजप सरकार सध्या प्रत्यक्ष कामकाजापेक्षा साेशल मीडियावरच अधिक सक्रिय असल्याचे दिसते. दाेन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील ट्विटर युद्ध चव्हाट्यावर अाले अाहे. या ट्विटर युद्धासंदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून माजी खडसेंना विचारले असता, अामच्या पक्षात लाेकशाही असून प्रत्येक निर्णय लाेकांना माहिती पाहिजे. शिवसेनेसारखे अादेश अामच्याकडे नसतात. मते मांडण्याचे स्वातंत्र्य असते. अाज साेशल मीडियावर शिवसेनेवरची व्यंगचित्रे, दिल्लीतील पत्रकाराने लिहिलेला महाराष्ट्र भाजप की साडेसाती, कुरघाेड्या, गृहकलहांमुळे काँग्रेसची सत्ता गेली अाता एकमेकांची जिरवण्यात भाजप जिरणार या पाेस्ट अाल्याचे त्यांनी दाखवले.
बातम्या आणखी आहेत...