आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्ट राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष : एकनाथ खडसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- केंद्रात भाजपची सत्ता असल्याने राज्याच्या विकासासाठी तरुण तडफदार उमेदवारास निवडून देऊन भाजपचा मुख्यमंत्री बनवण्यात खारीचा वाटा उचला, असे आवाहन करीत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष असल्याचा हल्लाबोल केला. मुंबईहून निघणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने ते सभेला येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी मोबाइलद्वारे मतदारांना संबोधित केले.
चाळीसगावात उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी जाहीर सभा झाली. व्यासपीठावर खासदार ए.टी.पाटील, माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे, वाडीलाल राठोड, वसंत चंद्रात्रे, आनंद खरात, के.बी.साळुंखे, राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. मतदारांनी खडसे यांची दीड तास प्रतीक्षा केली. मात्र, नंतर त्यांचा दौरा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे खासदार ए.टी.पाटील यांच्या मोबाइलवर संपर्क साधून खडसे यांनी भाषण केले. चाळीसगाव तालुक्यात सिंचन प्रकल्पांची मुहूर्तमेढ युती शासन असताना केली गेली. राष्ट्रवादी पक्षात गुंडांना स्थान असून, या पक्षातील मंत्र्यांनी कोट्यवधींचा मलिदा लाटला अाहे, असे ते म्हणाले. पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे यांनी एम.के.पाटील यांच्यावर टीका केली.
वर्चस्वाच्यालढाईची चर्चा : उन्मेषपाटील यांना उमेदवारी देण्यासाठी खडसे अनुकूल नव्हते. मात्र, जनाधार आणि सर्व्हेच्या आधारावर आमदार गिरीश महाजन यांनी राज्यातील दोन-तीन नेत्यांना विश्वासात घेत उन्मेष पाटील यांच्यासाठी दिल्ली दरबारी वजन वापरले, अशी चर्चा उमेदवारी जाहीर झाल्यावर तालुक्यात सुरू होती. शेवटच्या क्षणाला खडसेंचे समर्थक कैलास सूर्यवंशी यांचे तिकीट कापण्यात आले होते. उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीमुळे महाजन-खडसे यांच्यातील वितुष्ट पुन्हा समोर आले होते. त्यामुळेच खडसे या सभेला अनुपस्थित राहिले, असा सूर तालुक्याच्या राजकीय पटलावर उमटला. मात्र, खासदार ए.टी.पाटील यांनी आपल्या भाषणात बाजू सावरत हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री िशवराजसिंह चाैहान यांच्या जिल्ह्याच्या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुळे खडसे आले नसल्याचा खुलासा केला