आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संघात एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस होतो; एकनाथ खडसे यांचे वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्त आणि यंत्रणेत एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो, असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले आरएसएसचे जेष्ठ कार्यकर्ते आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूराव मांडे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.

 

राज्यासह देशभरात ज्या ज्या ठिकाणी संघाच्या शाखा आहेत. अशा ठिकाणी भाजपची वाढ झाल्याचा दावाही खडसेंनी केला. भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंगवरही त्यांनी जोरदार प्रहार केला. 

 

“बापूराव मांडे यांनी अडचणीच्या काळात आपल्याला  मार्गदर्शन केले. त्यांचे हे मार्गदर्शन आपल्या जीवनात अतिशय मोलाचे ठरले. 1980 च्या अगोदरच्या काळापासून संघाचे कार्य जळगाव जिल्ह्यात बापू मांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केले होते. त्यांच्या शाखांचा विस्तार देखील त्यांनी गावोगावी सुरु केला होता. निस्वार्थपणे नेते घडवले म्हणून हे शक्य झाले, असे खडसे यांनी नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...