आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाहीर माफीनाम्यानंतर रमेश जैन 'मुक्ताई' दारी, एकनाथ खडसे यांच्याशी १५ मिनिटे बंदद्वार चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सुरेश जैन यांनी निवडणूक लढवावी की नाही, यासाठी समर्थक व शिवसेना कार्यकर्त्यांसाठी गेल्या आठवड्यात जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जैन यांनी सर्वांचीच जाहीर माफी मागितल्यानंतर एकनाथ खडसेंनी जैन यांच्यासोबतचा अनुभव कटू असला तरी या वेळी त्यांच्यावर विश्वास ठेवूया, अशी सावध प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या सकारात्मक भूमिकेचा धागा पकडत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश जैन हे पत्नी माजी आमदार मधू जैन यांच्यासोबत सकाळी १०.१५ वाजता एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यावर पोहोचले. या भेटीतील महत्त्वाच्या दुव्याची भूमिका बजावली ती नगरसेवक अमर जैन यांनी. मात्र, या भेटीतील चर्चा बाहेर जाऊ नये म्हणून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बाहेर ठेवून बंद खोलीतच
चर्चा केली.
पुन्हा तासभर बसू
निरोप घेताना विरोधी पक्षनेते खडसे यांनी रमेश जैन यांना आपण बसू, एक तास चर्चा करू, असे सांगत आगामी भेटीचे सूतोवाच केल्याचे भेटीदरम्यान असलेल्या उपस्थितांनी सांगितले. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांकडून टाकण्यात आलेली पावले भविष्यातील राजकीय गणिते उलगडणारी ठरतील, असेच दिसते. खडसे व जैन यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न यापूर्वी पालिका निवडणुकीच्या वेळेस केला गेला होता.
सकारात्मक चर्चा
चर्चेनंतर रमेश जैन यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत आम्ही पुन्हा चर्चा करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. या भेटीत जळगाव शहरासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर चर्चा होऊन लवकरच पुढे दीर्घ बैठक घेऊन शहराचा िवकास आराखडा कशा पद्धतीने कार्यान्वित करता येईल, या विषयांवर चर्चा झाल्याचे जैन यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.