आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजीनामा दिला तरी माझ्याविरुद्धची मीडिया ट्रायल संपलेली नाही- एकनाथ खडसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मंत्रिपदाचा राजीनामा दिला तरी अद्याप माझ्याविरुद्धची मीडिया ट्रायल संपलेली नाही. हाेलाेग्रामच्या टेेंडरसंबंधी पुढे येत असलेले वृत्त हे त्याचाच प्रकार अाहे. मी अाणि मुख्यमंत्र्यांनी मिळून टेंडरच्या विषयात अनेक दुरुस्त्या केल्या. मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर ई-टेेंडरिंगची प्रक्रिया सुरू झाली अाहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी अाणखी दुरुस्त्या सुचवल्याने सुधारित टेेंडर काढले जात असताना अाेढून-ताणून त्याचा माझ्याशी संबंध जाेडला जात अाहे, असे स्पष्टीकरण माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी पत्रकारांशी बाेलताना केला.
‘बनावट दारू विक्री करणारी माेठी लाॅबी राज्यात सक्रिय असल्याने नागरिकांच्या अाराेग्यासह महसूल उत्पन्न देखील बुडत असल्याने हाेलाेग्राम ही प्रणाली वापरण्यासंदर्भात मी प्रयत्न सुरू केलेे. मी मंत्री हाेण्यापूर्वीदेखील असा प्रयत्न झाला परंतु लाॅबीचा त्याला विराेध हाेता. हाेलाेग्राममुळे एक रुपयादेखील खर्च न करता शासनाला वार्षिक तब्बल ५ हजार काेटींचा महसूल मिळणार हाेता. मंत्री म्हणून हे सर्व अधिकार मला असतानाही मी वित्त विभागाचे सचिव, उत्पादन शुल्क विभागाचे सचिव अाणि अायुक्त अशा तीन जणांची समिती नियुक्त केली हाेती. या समितीने दिलेला अहवालानुसार मुख्यमंत्र्याच्या स्वाक्षरीने कॅबिनेटच्या बैठकीत मंजूर करण्यात अाला. तीन वेळा प्रेझेंटेेशन दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अाणि मी त्यात दुरुस्त्या सुचवल्या. ही प्रक्रिया ई-टेंडरिंग असल्याने त्यात कुणाला जवळ करण्याचा प्रश्नच येत नाही. हाेलाेग्रामची निविदा ही अांतरराष्ट्रीय पातळीवर काढली जावी, त्यातील लक्षात अालेल्या त्रुटी दूर व्हाव्यात म्हणून सुधारित निविदा काढण्याचा निर्णय घेतला अाहे. ही वस्तुस्थिती असताना ताे केवळ खडसेंचा निर्णय हाेता म्हणून मुख्यमंत्र्यांनी निविदा रद्द केली असा खाेटा प्रचार केला जात अाहे. हीच मीडिया ट्रायल अाहे,’ असा अाराेपही खडसेंनी केला.
...असा हाेणार हाेता उपयाेग
निविदा दिलेल्या हाेलाेग्राम तयार करणारी कंपनी प्रिंट केलेले हाेलाेग्राम दारूचे उत्पादन केलेल्या कंपनीला विक्री करेल. त्यासाठी येणारा नगण्य खर्च ती उत्पादक कंपनीच देईल. बाजारपेठेत हाेलाेग्राम असलेली दारूच विक्री हाेणार असल्याने कंपनीचाही फायदा हाेईल अाणि शासनाला महसूलदेखील मिळेल. दारू खरेदी करणाऱ्या लायसन्सधारी व्यक्तीला शासन पेनासारखे एक उपकरण माेफत देईल. ताे पेन बाटलीवरील हाेलाेग्रामसमाेर धरल्यानंतर ती दारू बनावट अाहे किंवा नाही याचे सिग्नल देणारे लाल किंवा हिरवा लाइट त्या पेनवर लागेल. त्यामुळे बनावट दारू विक्रीला अाळा बसून शासनाला वार्षिक ५ हजार काेटी रुपयांचा महसूल मिळणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...