आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आचारसंहितेमुळे विकासकामांना लागला ब्रेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी शहरात सुरू झाली आहे. २७ नोव्हेंबरला मतदान आणि २८ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीमुळे शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे पालिकेकडून होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील विकासकामांना ब्रेक लागला आहे.
रखडलेल्या योजना अशा
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे शहरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यामुळे पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या अत्यावश्यक विकासकामांना ब्रेक लागला आहे. या कामांमध्ये प्रामुख्याने नगरोत्थान, अमृत या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजना, वरणगावरोडची दुरुस्ती आणि शहरातील मुख्य रस्त्यांवरील सेंट्रल पोलवर एलईडी दिवे बसवण्याच्या कामांना खीळ बसली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या अडचणी कायम आहेत.
निवडणुकीच्या कामांमध्ये पालिकेचे तब्बल १२५ कर्मचारी सहभागी आहेत. यामुळे विविध योजना आणि कामांच्या फाइलचा पाठपुरावा करणे शक्य नाही. तसेच यापूर्वी निविदेसाठी मंजूर झालेल्या कामांना सुरुवात झाली नाही. पालिकेने शेवटच्या टप्प्यात अनेक कामांना सर्वसाधारण सभेतून मंजुरी दिली होती. मात्र, पालिकेची निवडणूक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याचे संकेत होते. यामुळे नोव्हेंबरमध्ये किंवा दिवाळीच्या दरम्यान अर्थात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात विकासकामांना सुरुवात करण्याचे नियोजन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने केले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने दिवाळीपूर्वीच आचारसंहिता जाहीर केली. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने पालिकेतील सत्ताधाऱ्यांना नियोजित कामे करता आली नाहीत. अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या जंबो सर्वसाधारण सभेला ब्रेक लागला. पालिका प्रशासनाकडून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वसाधारण सभेसाठी विषयांची जमवाजमव सुरू करण्यात आली होती. मात्र हे नियोजनही कोलमडले. आता पालिकेतील नवीन सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात या कामांना सुरुवात होणार आहे.

लेखापाल नसल्याने फटका
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेरच्या टप्प्यात शहरात चार वर्षांपासून कामे होत नसल्याची ओरड कमी करण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीने कामांचे नियोजन केले. मात्र. याच दरम्यान मुख्य लेखापाल पदावरील कर्मचाऱ्याने दीर्घकालीन रजा घेतली. यामुळे मंजूर झालेल्या कामांचे बिल निघेल किंवा नाही? याबाबत शंका असल्याने मंजूर कामांनाही ब्रेक लागला. मुख्य लेखापाल दीर्घकालीन रजेवर गेल्याने बिले काढण्यात प्रशासकीय अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन कंत्राटदारांनी कामांकडे पाठ फिरवली. त्यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये प्रस्तावित कामांचे नियोजन ठप्प झाले.

अमृत योजना: शहरातीलपाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि सेव्हरेज वॉटर ड्रेनेजसाठी अमृत योजना मंजूर आहे. मात्र, पालिकेने अद्यापही या कामांसाठी अहवाल दिला नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केल्या जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी कामांमुळे शहरातील पाणीपुरवठा योजना नव्याने कार्यान्वित होईल.

नगरोत्थान योजना : पालिकेनेनगरोत्थान योजनेतील कामांचा खर्चअंदाज आणि सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे. सर्वात कमी दराच्या निविदेला यापूवी प्रशासनातर्फे मंजुरी मिळाली. मात्र नगरोत्थान कामाचे आराखडे मात्र तयार झाले नाहीत. यामुळे या योजनेलादेखील सध्या ब्रेक लागला आहे.

वरणगाव रोड रखडला : शहरातीलसर्वाधिक खड्डेमय आणि दोन वाहनधारकांचा बळी घेणाऱ्या वरणगावरोडच्या कामासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र, आचारसंहितेमुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता निवडणुकीनंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात हे काम पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

Áएलईडी दिवे : पालिकेनेवैशिष्टपूर्ण योजनेतून एलईडी दिवे बसवण्याचे नियोजन केले होते. यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवरील सेंट्रल पोलची निवड करण्यात आली होती. या योजनेतही निविदाप्रक्रिया झाल्यानंतर तत्काळ आचारसंहिता लागल्याने या कामालाही ब्रेक लागला.
बातम्या आणखी आहेत...