आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोगाने प्रभागांचा नकाशा मागवला, महापालिका निवडणुकीची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या अडीच वर्षांनंतर होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने कामाला सुरुवात केली आहे. प्रभाग रचनेसंदर्भातील प्रगणक गट दर्शवणारा माहितीचा नकाशा ३० डिसेंबरपूर्वी सादर करावा, असे आदेश दिले आहेत.
राज्यातील १० महापालिकांची पंचवार्षिक निवडणूक २०१७-१८ मध्ये होणार आहे. त्यात जळगाव महापालिकेचाही समावेश राहणार आहे. अडीच वर्षांपूर्वी २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत २०११च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना तयार करण्यात आली होती.
त्यावेळेसदेखील सुमारे १०० नकाशे तयार करण्यात आले होते. त्याच आधारावर आता पुन्हा २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचनेची प्रक्रिया राबवली जाणार आहे. संगणकाच्या माध्यमातून प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले.

फॅक्स मनपाला प्राप्त
प्रगणकगट चिंन्हांकित करून गुगल अर्थच्या माध्यमातून त्वरित नकाशा तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. नकाशांची ही माहिती ३० डिसेंबरपर्यंत राज्य निवडणूक अायाेगाकडे पाठवायची अाहे. निवडणूक आयोगाने अडीच वर्षांपूर्वीच प्रभाग रचनेच्या कामास सुरुवात केली असून त्यासंदर्भातील फॅक्स नुकताच पालिकेला प्राप्त झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...