आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission To Keep Tabs On Poll Ads In Social Media

व्हॉट्सअ‍ॅपवरील प्रचारास आता युजर्सकडूनच वेसण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - निवडणूक आयोगाचा निर्णय आणि दाखल प्रकरणे यांचा दाखला देत काही युजर्सनी सोशल मीडियावर तशा पोस्ट टाकणे सुरू केले आहे. त्यामुळे आता युजर्सच व्हॉट्सअ‍ॅपवरील प्रचार रोखण्याचे काम करीत आहेत.

फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपवर विनापरवानगी निवडणुकीचा प्रचार केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा निर्णय यंदा निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली आहे. दरम्यान, या कामासाठी तांत्रिक कर्मचारी नसल्यामुळे सोशल मीडियावरील प्रचारावर नियंत्रण कसे ठेवावे? असा प्रश्न प्रशासनास पडला होता. आता युजर्सनेच त्यावर उपाय शोधून काढला आहे.

एकाकडून दुसर्‍याकडे अशा प्रकारे सोशल नेटवर्किंगद्वारे लाखो लोकांच्या व्हॉट्स अ‍ॅपच्या मेल बॉक्समध्ये प्रचार आणि बदनामी केल्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पोस्ट सेव्ह झाल्या आहेत. त्यामुळे आता प्रचार किंवा बदनामी करणार्‍या पोस्ट युजर्स पुढे फॉरवर्ड करणे थांबवत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावरील प्रचाराला आपोआपच आळा बसत आहे, यास पोलिसांनीही दुजोरा दिला.

आचारसंहिताभंगाची कारवाई
सोशल मीडियाच्या माध्यमातून यंदा निवडणुकीचा प्रचार होण्याची शक्यता आहे. माध्यमांनी तरुणांना मोहिनी घातलेली आहे. ही बाब लक्षात घेऊन विनापरवानगी प्रचार करणार्‍यांवर आचारसंहितेचा भंग केल्याची कारवाई करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. देशात काही निवडक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हेही दाखल झाले आहेत.

आयोगाचे परिपत्रक फेसबुकवर
फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर निवडणूक आयोगाचे परिपत्रक टाकणे, देशभरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांचा दाखला देणे यासारखे प्रकार काही युजर्सनी स्वयंप्रेरणेने सुरू केले आहेत. त्यामुळे प्रचार करणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तथापि, हा प्रकार प्रशासनासाठी फायदेशीर ठरणार आहे.