आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commissioner Neela Satyanarayan Visit Jalgaon

जळगाव संवेदनशील; दक्षता घ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘‘अहो कापडणीस, जळगाव सेन्सिटिव्ह आहे. बंदोबस्त मागवला आहे का? जरा काळजीपूर्वक लक्ष घाला,’’ अशा शब्दात राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी महापालिकेच्या आयुक्तांसह जिल्हाधिकार्‍यांना सूचना दिल्या. सुनावणीदरम्यान गुगलचा मॅप व प्रोजेक्टर आवश्यक असल्याचे सांगताच अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली. जळगावात आल्यानंतर मला अमरावतीत आल्याचा भास होत असल्याचे त्यांनी सांगताच काही प्रमाणात असलेला तणाव क्षणात निवळला.

महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसंदर्भात दाखल हरकतींवर सुनावणीच्या निमित्ताने आयुक्त नीला सत्यनारायण जळगावात दुपारी 3 वाजून 24 मिनिटांनी दाखल झाल्या. त्यांच्यासोबत निवडणूक आयुक्त कार्यालयातील अधिकार्‍यांचाही समावेश आहे. अजिंठा विर्शामगृहातील ‘जेतवन’ या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या दौर्‍यानिमित्त अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेल्या सूटमध्ये त्यांचा मुक्काम आहे. सलामी देऊन स्वागत

आयुक्त नीला सत्यनारायण यांचा ताफा विर्शामगृहात दाखल होताच पोलिसांनी त्यांना सलामी दिली. या वेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, पालिका आयुक्त संजय कापडणीस, निवडणूक उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे तसेच महापालिका व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांसोबत पालिकेचे उपायुक्त भालचंद्र बेहेरे हे अजिंठापासून सोबतच होते.

दौर्‍यात त्यांच्यासोबत जनसंपर्क व माहिती अधिकारी जगदीश मोरे, कक्षाधिकारी अतुल जाधव, सहायक के.के.सुलाने, स्वीय सहायक प्रमोद पंडित आहेत.

सकाळी 10 पासून कामकाज
प्रभागातील परिसरासंदर्भात माहिती कशी द्याल, काय व्यवस्था केली आहे असे विचारत गुगल मॅपची व प्रोजेक्टरची व्यवस्था करा. त्याशिवाय मला परिसराची माहिती कळणार नाही. अगोदर त्याची व्यवस्था करा असे सांगत सकाळी 10 वाजेपासून सुनावणीला सुरुवात करू या अशा सूचना दिल्या. 35 हरकतींवर सुनावणी होणार आहे. दुपारपर्यंत कामकाज आटोपून नंतर अधिकार्‍यांसोबत बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.

हा फोटो कसला हो
राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना विर्शाम करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जेतवन या सर्किट हाऊसची पाहणी करताना त्यांनी अधिकार्‍यांना अहो, मला तर हे पाहून अमरावती असल्याचा भास होत असल्याचे आवर्जून सांगितले. त्यानंतर हॉलमध्ये आल्यानंतर हा फोटो कसला हो असे जिल्हाधिकारी राजूरकर यांना विचारणा केली असता त्यांनी नालंदा विद्यापीठाचा असल्याचे सांगितले. चहा पाण्याच्या कार्यक्रमादरम्यान मला शुगर फ्री चहा हवा आहे. जाऊ द्या, गरम पाणी व दूध द्या, मी तयार करून घेईल, असे सांगितले.

आढावा घेताना सूचनांवर भर
जळगाव हे सेन्सिटिव्ह ठिकाण आहे. पोलिस बंदोबस्त मागवला आहे का? असे आयुक्तांनी विचारताच जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त चकित झाले. तसेच अधिकार्‍यांसोबत मिटिंग केव्हा घ्यायची. तुमची निवडणुकीसंदर्भातील तयारी पूर्ण झाली आहे का? असे अनेक प्रश्न करीत माहिती जाणून घेतली. परिसराला जोडणे व तोडण्यासंदर्भात ज्या तक्रारी आहेत, त्यांना सुनावणीदरम्यान एकत्रित बोलावून घ्या. तसेच आरक्षणासंदर्भात तक्रारी आहेत का? याचीही विचारणा केली. त्यावर आयुक्तांनी हरकती साधारण असल्याचे सांगितले.