आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ओळखपत्र द्या, पैसे घ्या’ प्रकरणी तक्रारीची प्रतीक्षा; निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पालिका निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवून त्यांच्याकडून मतदान कार्ड जमा करून घेतले जात असल्याचे प्रकार सुरू आहेत. ‘दिव्य मराठी’तर्फे या प्रकरणावर प्रकाश टाकूनही मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त संजय कापडणीस यांच्यातर्फे ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

पालिका निवडणुकीत मते मिळवण्यासाठी काही उमेदवारांकडून मतांचा बाजार मांडला आहे. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड असे महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेऊन संबंधित मतदारास पैसे दिले जात आहेत. पालिकेच्या आचारसंहिता कक्षातर्फे अशा प्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवणे अपेक्षित असते. मात्र, नागरिकांकडून तक्रार प्राप्त नसल्याचे कारण पुढे करत प्रशासकीय यंत्रणा याकडे सोयीने दुर्लक्ष करत आहे. पालिकेतील मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त संजय कापडणीस यांना याप्रकरणी काय कारवाई करणार, असे विचारले असता पोलिस विभागातील गोपनीय शाखा या प्रकरणी कारवाई करणार आहे. गोपनीय शाखेला आपल्याकडून यासंदर्भात काही पत्रव्यवहार केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.