आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांच्या आशीर्वादाने इच्छुक आले जोशात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- 25-30 वर्षांपासून वर्चस्व असलेल्या जैन गटाच्या सोबत काम करणार्‍यांनाही मोठे व्हायचे आहे. आपलेच कार्यकर्ते मोठे होत असतील तर काय हरकत आहे, अशी भूमिका खान्देश विकास आघाडीने जाहीर केल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नेत्यांचे आशीर्वाद मिळाल्याने कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्रीय राजकारणात सक्रिय होण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून संधी पडताळून पाहणार्‍या किशोर पाटील यांना खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन यांनी शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले होते. याचवेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले होते की, खान्देश विकास आघाडीचा अजेंडा अत्यंत स्पष्ट आहे. आमच्याकडे सर्व पार्टीचे लोक आहेत. जळगाव शहराच्या आणि पालिकेच्या विकासासंदर्भात जेव्हा विषय येतो तेव्हा ते आमच्याशी बांधिल आहेत. बाकीच्या गोष्टीत ज्यावेळी त्यांना राज्यपातळीवर किंवा केंद्रीय राजकारण करताना जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा त्या पार्टीत किंवा पक्षात ते प्रवेश करू शकतात. आमच्याकडून कुठल्याही प्रकारची हरकत किंवा बंधन नसते. आमचे बंधन फक्त जळगाव शहराच्या विकासासाठी आहे. आमच्या सहकार्‍यांना संधी मिळत असल्यास आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद त्यांच्या सोबत राहतील. आघाडीच्या अध्यक्षांचे हे सूचक वक्तव्य पाहता जैन गटाशी प्रामाणिक राहिलेले काही चेहरे लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसणे शक्य आहे.

जळगाव विधानसभेत सुरेश जैन यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे चंद्रकांत सोनवणे यांचे नाव चोपडा विधानसभेसाठी चर्चेत आहेत. गुलाबराव देवकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत विष्णू भंगाळे यांनीही कॅलेंडरच्या माध्यमातून घराघरात पोहोचण्याचा प्रय} सुरू केला आहे. किशोर पाटील यांचे लोकसभेचे गणित चुकले असले तरी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लक्षात घेता चांगल्या संधीसाठी ते प्रय}शील राहतीलच. नगरसेवक कैलास सोनवणे यांनीही पालिका राजकारणाच्या पलीकडे उडी घेण्याची मनीषा अनेकांजवळ बोलून दाखवली आहे. विद्यमान स्थायी समिती सभापती नितीन लढ्ढा यांच्या कुटुंबातूनही विधानसभेसाठी त्यांचे नाव पुढे येण्याची शक्यता राजकीय गोटात व्यक्त केली जात आहे. किंगमेकरची भूमिका वठवणार्‍या जैन गटाकडूनच कार्यकर्त्यांना पालिकेबाहेरील राजकारणासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याने भविष्यातील चित्र काही वेगळे असू शकेल.