आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांचे पथक दाेन्ही प्रभागांत दुचाकीवर घालणार गस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेच्या प्रभाग तीन प्रभाग सहामधील प्रत्येकी एका जागेसाठी रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान हाेईल. संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी म्हणून पाेलिसांचे एक पथक दिवसभर दुचाकीवरून गस्त घालणार अाहे.

प्रभाग तीन-क अाणि प्रभाग सहा-अ मधील पाेटनिवडणुकीसाठी दाेन्ही प्रभागांत एकूण १८ मतदान केंद्र अाहेत. नियुक्त केलेले १५० कर्मचारी शनिवारी मतदानाचे साहित्य ईव्हीएम घेऊन केंद्रांवर रवाना झाले आहेत. डीवायएसपी राेहिदास पवार यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. डी.एस. हायस्कूलमध्ये ६, झाेपे विद्यालयात उर्दू हायस्कूलमध्ये दाेन असे ११ मतदान केंद्र शहर पाेलिस ठाणे हद्दीत अाहेत. अंजुमन हायस्कूलमध्ये ३, नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये अहिल्यादेवी कन्या विद्यालयात ही केंद्र बाजारपेठ पाेलिसांच्या हद्दीत अाहेत. सर्व केंद्रांवर पाेलिसांचा खडा पहारा राहणार अाहे. डीवायएसपी राेहिदास पवार यांच्या नेतृत्वाखाली शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब केदारे, बाजारपेठचे निरीक्षक किसन नजनपाटील, तालुक्याचे निरीक्षक बाळासाहेब गायधनी, सहायक पाेलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, एक अारसीपी प्लाटून तैनात असेल.

मतमाेजणी साेमवारी पालिकेत हाेणार
पालिकेच्या सभागृहात साेमवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू हाेईल. त्यासाठी चार टेबल असतील. अवघ्या अर्ध्या तासात निकाल लागणे शक्य अाहे. दरम्यान, मतमाेजणीमुळे पालिकेसमाेरील रस्त्यावर वाहतूक काेंडी हाेऊ नये म्हणून या दिवशी हा मार्ग एकेरी करण्यात येणार अाहे. दुतर्फा एक ते दीड तास बॅरिकेड्स लावण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

पाेट निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली अाहे. नियुक्त कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करून मतदान केंद्रांवर रवाना करण्यात अाले. कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, मतमाेजणीचेही सूक्ष्म नियाेजन केले अाहे. - बी.टी. बाविस्कर, सहायकनिवडणूक अधिकारी