आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election News In Marathi, Ramesh Jain News Issue Divya Marathi

रमेश जैन यांनी माहिती मुद्दाम दडवली का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मनपा निवडणुकीत उमेदवारी दाखल करताना रमेश जैन यांनी शपथपत्रात मालमत्तेची माहिती दडवली होती; हे केवळ सिद्ध होऊन भागणार नसून त्यांनी ती मुद्दाम दडवली होती, हे त्यांचे प्रतिस्पर्धी आणि याचिकाकर्ते मुकुंद ठाकूर यांना आता सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे.

खाविआचे अध्यक्ष रमेश जैन यांनी मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 21 ‘ब’मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या वेळी शपथपत्रात मालमत्तेची अपूर्ण माहिती सादर केल्याचे याचिकाकर्ते मुकुंद ठाकूर यांचे म्हणणे आहे. जळगाव दिवाणी न्यायालयात यासंदर्भात निवडणूक याचिका त्यांनी दाखल केली आहे. त्या याचिकेच्या सुनावणीसाठी न्यायालयाने आता प्रमुख 9 मुद्दे निश्चित केले आहेत. त्यात रमेश जैन यांनी मालमत्तेची माहिती मुद्दाम लपवली होती का? हा प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळे माहिती लपवली हे सिद्ध झाले तरी ती माहिती त्यांनी मुद्दाम दडवली होती आणि त्यामागे त्यांचा विशिष्ट हेतू होता, हेही याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सिद्ध करावे लागेल. न्यायाधीश गोगारकर यांच्यापुढे 12 जून रोजी कामकाज होईल. त्या वेळी साक्षीदारांची यादी सादर केली जाणार असून साक्ष नोंदवणे सुरू होईल. मुकुंद ठाकूर यांच्यावतीने अँड.प्रदीप कुळकर्णी तर रमेश जैन यांच्यातर्फे अँड.दिलीप परांजपे काम पाहत आहेत.
या 9 मुद्यांवर सुनावणी
1) जैन यांच्या नामांकनाच्या गैर स्वीकृतीमुळे प्रभाग क्रमांक 21 ‘ब’ची निवडणूक बाधित झाली काय? 2) नामांकन अर्ज भरताना फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवली आहे का? 3) निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या मालमत्तेची महत्त्वपूर्ण माहिती मुद्दाम लपवली आहे का? 4) आवश्यक असलेली माहिती पुरवली आहे का? 5) याचिकेत आवश्यक पक्षाला सहभागी न केल्याने बाधा येते का? 6) निवडणूक अर्ज आहे त्या स्वरूपात चालवण्या योग्य आहे काय? 7) या न्यायालयाला विशेष अधिनियमाखालील लवाद म्हणून निवडणूक अर्जातील तक्रारी लक्षात घेण्याचा अधिकार आहे का? 8) रमेश जैन यांची निवडणूक अवैध आणि बेकायदेशीर असल्याचे घोषित करण्याचे अधिकार या न्यायालयास आहे का? 9) असल्यास प्रभाग क्रमांक 21‘ब’ची फेर निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयास आहेत का?
याचिकाकर्ते ठाकूर यांना करावे लागेल सिद्ध