आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीज न देणे भोवले; क्रॉम्प्टन ग्रीव्हजच्या संचालकांना समन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- खान्देश फ्रॅँचायझी प्रायव्हेट लिमिटेड यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेत जळगाव न्यायालयाने क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीचे चेअरमन गौतम थापर यांच्यासह सर्व संचालकांना जळगाव न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश दिले आहेत.

क्रॉम्प्टनला फ्रॅँचायझी देण्यापूर्वी महावितरणने खान्देश सेंट्रलमध्ये वीजपुरवठा करण्यासाठी जळगाव एनर्जी कंपनीला फ्रॅँचायझी दिली आहे. ही माहिती महावितरणने क्रॉम्प्टनपासून दडवून ठेवल्यामुळे महावितरण आणि क्रॉम्प्टन ग्रीव्हज् कंपनीत वाद सुरू आहेत. त्यातूनच क्रॉम्प्टनने दुरुस्तीचे कारण दाखवून 1 जुलै 2012 रोजी खान्देश फ्रॅँचायझीचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्याविरुद्ध न्यायालयाने महावितरण आणि क्रॉम्प्टनला आहे त्या परिस्थितीत वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेश दिले होते. महावितरणनेही तसे आदेश क्रॉम्प्टनला दिले होते. मात्र क्रॉम्प्टनने वीजपुरवठा सुरळीत केला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याची याचिका खान्देश फ्रॅँचायझी यांनी जळगाव दिवाणी न्यायालयात दाखल केली होती.

या संदर्भात दिनांक 29 जुलै रोजी सुनावणी झाली. यात क्रॉम्प्टनचे चेअरमन गौतम थापर यांच्यासह व्हाइस चेअरमन आणि सर्व संचालक आणि स्थानिक अधिकार्‍यांना दिनांक 20 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.