आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electric Material Thief Issue In Jalgaon Midc Area

जळगाव एमआयडीसीच्या गोडाऊनमध्ये सापडले तांब्याच्या तारांचे घबाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉइल आणि अॅल्युमिनियमच्या तारा चोरणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास अटक केली. चोरी केलेले लाख ५६ हजार ३८१ रुपयांचे सुमारे दीड टन साहित्य चोरट्याने एमआयडीसीतील गोडाऊनमध्ये ठेवले होते. यात आणखीन आरोपी, साहित्य एक मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे.

रावेर आणि यावल तालुक्यातून गेल्या अनेक दिवसांपासून ट्रान्सफॉर्मरमधील कॉइल, अॅल्युमिनियमच्या तारा चोरण्याचे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात महावितरणच्या अभियंत्यांनी अनेकवेळा गुन्हा दाखल करूनही त्याचा छडा लागत नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांना बुधवारी महावितरणच्या चोरीचे साहित्य एमआयडीसीतील गोडाऊनमध्ये ठेवले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक गणेश कदम, भास्कर पाटील, मिलिंद सोनवणे, शरद भालेराव, सिद्धार्थ बैसाणे, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, मंगलसिंग पाटील, महेंद्र बागूल, सतीश गवळी, दत्तात्रेय बडगुजर, विनय देसले, प्रवीण हिवराळे, सुनील लोहार यांचे पथक त्यांनी शोधासाठी पाठविले. दोन दिवस शोध घेतल्यानंतर शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास पथकाला गोपाल दाल मिलच्या उत्तरेस एमआयडीसीमधील प्रदीप बोंडे यांच्या मालकीच्या सेक्टर ई-१६/४ महेश एन्टरप्रायजेस या गोडाऊनमध्ये चोरीचा माल लपवून ठेवलेल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने त्या ठिकाणी छापा टाकला. त्या वेळी इलियासबीन महंमद चौधरी (रा. अक्सानगर) हा त्या गोडाऊनमध्ये बसलेला होता. त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, महावितरणचे चोरीचे साहित्य असल्याची कबुली त्याने दिली.

पुढे काय?

एलसीबीने शुक्रवारी केलेल्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखीन आरोपी असण्याची दाट शक्यता आहे. एवढेच नव्हे तर चोरी करणारे मोठे रॅकेट सुद्धा असू शकते. त्यामुळे एलसीबी आता त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवेल. वेळप्रसंगी ते विविध ठिकाणी धाड सुद्धा टाकू शकतात.

२५१ डीपींची चोरी

एका वर्षात रावेर आणि यावल या दोनच तालुक्यांतून २५१ ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याचे कार्यकारी अभियंता बंड यांनी सांगितले. त्यापैकी केवळ ते ट्रान्सफॉमरचे साहित्य शुक्रवारी एलसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत सापडले आहे.

काय आहे चोरीचे साहित्य?

एलसीबीने केलेल्या कारवाईत लाख ५६ हजार १५१ रुपये किमतीच्या ८२१.८५ किलो वजनाच्या स्टॅपिंग प्लेट, २८ हजार ६५० रुपये किमतीच्या १४३.२५ किलो वजनाच्या अॅल्युमिनियम तार इन्सुलेशन पेपर कोटिंगसह, हजार २०० रुपये किमतीचे ११.४०० किलो वजनाचे इन्सुलिन पेपर, ६९ हजार ३८० रुपये किमतीचे ३४६.९ किलो वजनाचे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील कॉइल, अॅल्युमिनियम वायर, असे एकूण टन क्विंटल २३.४० (१३२३ किलो) लाख ५६ हजार ३८१ रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी सावदा येथील महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता युवराज नामदेव फिरके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या वेळी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शरद किसन बंड, सहायक अभियंता रेवानंद खेडेकर, जितेंद्र धांडे उपस्थित होते.

यात आणखी आरोपी असण्याची दाट शक्यता

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या कारवाईत महावितरणचे साहित्य जप्त केले आहे. यात आणखीन आरोपी, साहित्य असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. प्रभाकर रायते, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा