आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळ: 30 हजार ग्राहकांकडे ‘इन्फ्रारेड’ वीज मीटर; गळती कमी होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहर भारनियमनमुक्त करण्यासाठी वितरण कंपनीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात शहरातील 10 हजार ग्राहकांकडे इन्फ्रारेड वीजमीटर बसवण्यात आले. आता तिसर्‍या टप्प्यात 30 हजार ग्राहकांचे उद्दिष्ट आहे. या मुळे गळती कमी होऊन शहर भारनियमनमुक्त होण्याची अपेक्षा आहे.

भुसावळ शहरात वीज वितरण कंपनीचे 40 हजार ग्राहक आहेत. पूर्वी इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटर बसवण्यात आले होते. मात्र, या मीटरमध्ये ग्राहक छेडछाड करुन रिडिंगमध्ये तफावत निर्माण करतात. परिणामी वीज गळतीचे प्रमाण वाढते. यावर उपाय म्हणून कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन इन्फ्रारेड वीज मीटर तयार केले. पहिल्या टप्प्यात शहरातील राममंदिर, विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज संकुल आणि उंट मोहल्ला परिसरातील वीज मीटर बदलवले. या मुळे गळतीचे प्रमाण कमी होऊन हा भाग भारनियमनमुक्त झाला आहे. यानंतर दुसर्‍या टप्प्यात बद्रीप्लॉट, कन्हैयालाल प्लॉट आणि सिंधी कॉलनी परिसरातील मीटर बदलण्यात आले होते. आता तिसर्‍या टप्प्यात शहरातील उर्वरित सर्वच भागातील वीज मीटर बदलण्यात येतील. यासाठी प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. इलेक्ट्रो मॅग्नेटिक मीटर बदलवून नवीन तंत्रज्ञानाचे इन्फ्रारेड मीटर बसवल्यास संपूर्ण शहरातील वीजगळती थांबेल, अशी वीज वितरण कंपनीची अपेक्षा आहे.

ग्राहकांचे सहकार्य हवे
शहर भारनियमन मुक्तीसाठी वीजमीटर बदलण्याची व्यापक संकल्पना हाती घेतली आहे. पहिल आणि दुसरा टप्पा यशस्वी केल्यानंतर आता तिसर्‍या टप्प्याचे काम हाती घेतले आहे. सव्र्हीस वायर ते मीटरपर्यंतच्या उपकरणांवर कंपनीचा अधिकार असल्याने आम्ही वीज मीटर कोणत्याही क्षणी बदलवू शकतो. ग्राहकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा.
-ए.एन.भारंबे, उप कार्यकारी अभियंता, भुसावळ

एक्स्प्रेस दोनमध्ये गळती
शहरातील एक्स्प्रेस दोनमध्ये येणार्‍या जामनेर रोडच्या डावीकडील गंगाराम प्लॉट आणि परिसरात गळतीचे प्रमाण वाढले आहे. या मुळे इ ग्रुपमध्ये असलेला हा भाग आता एफ ग्रुपमध्ये गेला आहे. एफ ग्रुपच्या निकषांनुसार रात्रीचे भारनियमन होते. दरम्यान, 10 ऑगस्टपासून या भागातही रात्रीचे भारनियमन सुरु होण्याची शक्यता आहे. इन्फ्रारेड वीजमीटर वापरुन गळती थांबवल्यास भारनियमनाचे हे संकट टळू शकेल. पहिल्या टप्प्यात शहरातील राममंदिर, विठ्ठल मंदिर भागात इन्फ्रारेड वीज मीटर बसवण्यात आले आहेत.

ग्राहकांचा होतोय विरोध
जुने मॅग्नेटिक मीटर बदलवून आयआर मीटर बसवण्याचे काम सुरु आहे. मात्र, नवीन मीटर बसवण्यास विरोध होत आहे. नवीन मीटरचे शुल्क वसूल केले जाईल, असा समज झाला आहे. मात्र नियमानुसार सव्र्हीसवायर आणि मीटर ही वीज कंपनीची मालमत्ता असल्याने त्या बदलण्याचा अधिकारही वीज वितरण कंपनीचा आहे. यासाठी वीज वितरण कंपनी ग्राहकांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भुर्दंड लादू शकत नाही. यामुळे नागरिकांचा विरोधही कायद्याच्या आधाराने निर्थक ठरत आहे.