आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electric Meter Issue In Jalgaon; 1.25 Lac Fine Recover To Auto Rickshaw Driver

जळगावात इलेक्ट्रॉनिक मीटर सक्ती; 48 रिक्षाचालकांना सव्वा लाखांचा दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- इलेक्ट्रॉनिक मीटर सक्ती आदेशाचे उल्लंघन करणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी 8 जुलैपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विशेष मोहीम राबविली जात आहे. कागदपत्रांसह पीयुसी नसलेल्या 48 रिक्षाचालकांकडून आतापर्यंत एक लाख 20 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

परमिट नसणे, फिटनेस लायसन्स नसणे, इन्शुरन्स आणि पीयूसी नसलेल्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. कारवाईच्या मोहिमेदरम्यान 160 रिक्षा परिवहन कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी जप्त केल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील रिक्षांना गेल्या वर्षी जुलै महिन्यात इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचा आदेश लागू केला होता. मात्र, रिक्षचालकांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केले होते. महापालिका क्षेत्रात एकूण 6 हजार 754 परवानाधारक रिक्षा आहेत. त्यापैकी 868 रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविले. अद्यापही 5886 रिक्षाचालकांनी मीटर बसविलेले नाही. इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यासाठी अडीच ते तीन हजारापर्यंत खर्च येतो. 8 जुलैपासून सुरू झालेल्या कारवाईच्या सत्रामुळे चालकांमध्ये या नियमाविषयी जनजागृती होत आहे.

रिक्षाचालकांवर खर्चाचा भार
इलेक्ट्रॉनिक मीटर नसल्या कारणाने परिवहन विभागातर्फे रिक्षाचालकांवर कारवाई केली जात आहे. कारवाईदरम्यान अनेक रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या रिक्षांबाबत परमिट नसणे, फिटनेस लायसन्स नसणे, इन्शुरन्स आणि पीयूसी नसणे अशाप्रकारचे दोष आढळत आहेत. त्यामुळे एका रिक्षामागे सरासरी पाच ते सहा हजारांचा दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याच्या खर्चासह दंडाच्या रकमेचाही भार रिक्षाचालकांना सोसावा लागत आहे. जप्त केलेल्या रिक्षा सोडविण्यासाठी सोमवारी परिवहन कार्यालयात आलेल्या अनेक रिक्षाचालकांच्या कर्मचार्‍यासोबत शाब्दिक चकमकी उडाल्या.

भाडेआकारणीचा गोंधळ कायम
सध्या शहरात मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही. मीटर बसविल्यानंतरही रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणेच भाडे आकारणी करावी अथवा नाही यासंदर्भात आरटीओंकडून सूचना नाहीत. त्यामुळे रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची सक्ती केली जात असताना भाडेआकारणीचा गोंधळ मात्र कायम आहे.

दंड आकारणी अशी
>परमिट नसणे -52000
>फिटनेस सर्टिफिकेट नसणे -52700
>लायसन्स नसणे- 5600
>पीयूसी नसणे -51000
>इन्शुरन्स नसणे -5600
>बॅज व कागदपत्र नसणे -5100

कारवाईत आत्तापर्यंत

>6754 शहरातील एकूण रिक्षा
>160 रिक्षा अद्याप आरटीओ कार्यालयात जप्त
>177 रिक्षा आढळल्या दोषी
>5886 विना मिटरधारक
>895 रिक्षांची तपासणीं