आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलवरून हाताळता येतील घरातील वीज उपकरणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: ‘आयटी फेस्टा’मध्ये मोबाइलवरून वीजदिवे नियंत्रित करणा-या उपकरणाची माहिती देताना प्रदीप भराड.
जळगाव - घराबाहेरपडताना एखाद्या वेळी आपण घाईगर्दीत घरातील विजेचे उपकरणे बंद करायला विसरलो, तर आपली चांगलीच पंचाईत होते. पण या समस्येवर बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रदीप भराड याने उपाय शोधला आहे. त्याने मोबाइलवर ही उपकरणे सुरू बंद करण्याचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. मोबाइलवरील ब्ल्यू-टूथद्वारे ही सिस्टिम कार्यान्वित केली जात असल्याने, ती सामान्यांच्या खिशालादेखील परवडणारी आहे.

दैनंदिन कामकाजासह उद्योग, व्यवसाय घरगुती कामात उपयुक्त ठरणा-या सॉफ्टवेअरची निर्मिती केसीई सोसायटी संचालित आयएमआर महाविद्यालयात आयटी फेस्टांतर्गत विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यभरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी यात सहभागी झाले असून, त्यांचे ६० सॉफ्टवेअरचे हे वेगवेगळे वैशिष्ट्ये आहेत.

मोशन बेस वेबकॅमेरा वाचवणार मेमरी
विविधव्यवसाय, उद्योगांमध्ये सुरक्षेसाठी लावण्यात येणारा सीसीटीव्ही कॅमेरा दिवस-रात्र सुरू राहत असल्याने यात मोठ्या प्रमाणात मेमरी खर्च होते. यासाठी गरजेपुरता मेमरीचा वापर म्हणून, बांभोरी अभियांत्रिकीच्या संदीप पाटील, मयूर चौधरीने मोशन बेस सिक्युरिटी विथ वेबकॅमे-याचे अद्ययावत सॉफ्टवेअर तयार केले आहे. ज्या वेळी कॅमे-यात एखादी इमेज दिसेल, त्या वेळेचाच क्षण कॅमेरा टिपेल.

घरीच वापरा ‘एटीएम’
एटीएममशीनमधून पैसे काढणे अथवा टाकण्याचे जुजबी ज्ञान नसल्याने बहुतांश ग्राहक त्याचा वापर टाळतात. मात्र, घरबसल्या एटीएमचा वापर करण्याचा सराव देणा-या सॉफ्टवेअरची निर्मिती आयएमआर महाविद्यालयाच्या शेख इम्रान कांचन पाटील यांनी केली आहे. तसेच बँकेच्या योजनांची माहितीही या सॉफ्टवेअरमधून मिळणार आहे.

जिम मॅनेजमेंट सिस्टिम
जिममधीलवाढती संख्या अन् साहित्याची माहिती अपडेट ठेवण्यासाठी आयएमआर महाविद्यालयाच्या विशाल शिंदे, लवली सिंग या विद्यार्थ्यांनी जिम मॅनेजर सिस्टिमचे सॉफ्टवेअर बनवले आहे. जिममधील उपस्थिती, सदस्यांची संख्या अद्ययावत साहित्य सामग्री, सदस्यांची प्रवेशप्रक्रिया यासह प्रशिक्षकांची माहितीही संग्रहित केली आहे.

हजार रुपयांत होम ऑटोमेशन सिस्टिम
बांभोरीअभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रदीप भराड याने होम ऑटोमेशन सिस्टिम हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. याद्वारे आता घरातील विजेची उपकरणे ही मोबाइलवरून सहज नियंत्रित करता येणार आहेत. यासाठी प्रदीपने एक कीट तयार केली आहे. त्याला २३० व्होल्टचा एसी सप्लाय द्यावा लागतो. त्यानंतर मोबाइलवरील ब्ल्यू-टूथच्या साहाय्याने आपणास घरातील उपकरणे सुरू किंवा बंद करता येतील. हे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी प्रदीपला हजार रुपये खर्च आला आहे.