आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Demand Doubled, 11 To 14 MW Electricity Use Daily

विजेची मागणी दुप्पट , दरराेज लागते ११ ते १४ मेगावॅट वीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - येथील विभागात गेल्या २० दविसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. दररोजचे कमाल तापमान ३५ अंशांदरम्यान पोहोचले आहे. परिणामी आता जुलै महिन्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा बसत आहे. शहरातील ४० हजार वीजग्राहकांना दररोज मेगावॅट विजेची आवश्यकता भासते. मात्र, आता तापमान वाढीचा फटका बसत असल्याने दररोज ११ ते १४ मेगावॅट विजेची गरज भासत आहे.

शहरात पावसाळा आणि हिवाळ्यात मेगावॅट प्रतिदिन विजेची गरज भासते. उन्हाळ्यात मे महिन्यात ही मागणी १५ मेगावॅटपर्यंत पोहोचते. गेल्या पंधरवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे कुलर्स, वातानुकूलित यंत्रणा, पंखे आदींचा वापर कमी झाला होता. परिणामी विजेची मागणीही घटली होती. परंतु, आता पाऊस लांबला असून, सरासरी कमाल तापमान ३५ अंशांपेक्षा अधिक आहे. परिणामी कुलर्स, एसी आणि विजेवरील उपकरणांचा वापर पुन्हा वाढला आहे. शहराला दररोज ११ ते १४ मेगावॅट विजेची आवश्यकता भासत आहे. ऐन जुलै महिन्यात नागरिकांना ऑक्टोबर हीटचा तडाखा सहन करावा लागत आहे. वीज उपकरणांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाणही वाढले असून सातत्याने बिघाड दुरुस्तीसाठी कर्मचा-यांना धावपळ करावी लागत आहे. विजेची वाढती मागणी पाहता पुरवठा करणे सोयीचे नाही. यामुळे वरिष्ठ कार्यालयातून आलेल्या सूचनांनुसार तातडीचे भारनियमन करावे लागत आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातील दीपनगर टाऊन, नाहाटा आदी सबस्टेशनवर वीजपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे
पुढील स्लाईडवर वाचा...