आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Employee Inheritance Reservation Power Minister Bawankule

वीज कर्मचाऱ्यांच्या वारसांना आरक्षण, ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचेआदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्य विद्युत मंडळातील तिन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरळसेवा भरतीमध्ये आरक्षण देण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी बुधवारी कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत दिले. या निर्णयामुळे वीजकर्मचा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मागणीसाठी राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेने आंदोलन करून पाठपुरावा सुरू ठेवला होता, अशी माहिती तांत्रिक वीज कामगार संघटनेचे जिल्हा सचिव आर.आर. सावकारे यांनी दिली.

राज्यातील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांतील तांत्रिक कामगारांच्या वाढत्या समस्यांसह विविध मागण्यांसाठी शासनाचे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनांनी विधानसभेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत ऊर्जामंत्र्यांनी संघटनांचे प्रतिनिधी वीज कंपन्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली. यात दोन तपापासूनच्या तांत्रिक कामगारांच्या स्वतंत्र वेतनश्रेणीबाबत प्रधान ऊर्जा सचिवांना संघटनेसमवेत चर्चा करून अहवाल सादर करण्याचे िनर्देश दिले. तसेच तांत्रिक, अतांत्रिक कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन, त्यांच्या कामाचे तास ठरवण्यासाठी केंद्र शासनाकडून स्पेशल ऑडीट करणे, या ऑडीटचा अहवाल प्रशासन संघटनांना बंधनकारक राहील. कंत्राटी कामगारांना कायम करण्यासह स्वेच्छानिवृत्ती योजना तिन्ही कंपन्यात लागू करण्याबाबत २३ एप्रिलला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्याचेही ठरले.

कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या अवलंबितास १० लाखांचा विमा उतरवण्याच्या प्रस्तावासह विद्युत सहायकांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत चर्चा झाली. तांत्रिक कामगार संघटनेचे मे महिन्यात सोलापूर येथे होणाऱ्या अधिवेशनाचे निमंत्रणही ऊर्जामंत्र्यांना देण्यात आले. या वेळी जिल्हा संघटनेचे के.आर. ठोसरे, झेड.एस.शेख आदी उपस्थित होते.