आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाॅवरवर वीज काेसळल्यामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्हा अंधारात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तातलुक्यातील दाेंडाईचा येथून २० किलाेमीटर अंतरावर असलेल्या वीज कंपनीच्या टाॅवरवर पावसाळी वीज काेसळल्यामुळे टाॅवर उद्ध्वस्त झाला. त्यामुळे शहादा वगळता संपूर्ण नंदुरबार अंधारात अाहे. वीज पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाॅवर दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले अाहे. जिल्ह्यातील पाताेंड्यासह १७ उपकेंद्रांवरील वीजपुरवठा बंद झाला. सायंकाळी ४.४५ वाजेपासून संपूर्ण जिल्ह्यातील वीजपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे शहरवासीयांना माेठ्या अडचणींना सामाेरे जावे लागले.

नंदुरबार शहराला दाेंडाईचा येथील मुख्य वीज केंद्रावरून वीजपुरवठा केला जाताे. तेथून पाताेंडा येथील केंद्रात त्यानंतर पुढे १७ उपकेंद्रांना हा वीजपुरवठा हाेताे. मात्र, साेमवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास दाेंडाईचा येथून २० किलाेमीटर अंतरावर असलेल्या वीज कंपनीच्या टाॅवरवर पावसाळी वीज काेसळली. त्यामुळे टाॅवर उद‌्ध्वस्त झाला. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला हाेणारा वीजपुरवठाही बंद पडला. शहादा शहर तालुका वगळता नंदुरबार शहरासह नवापूर, तळाेदा, धडगाव या तालुक्यांमधील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद हाेता. साेमवारी पावसाचे वातावरण नव्हते. दिवसभर उकाडा जाणवत हाेता. मात्र, सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. त्याच वेळी वीजपुरवठाही खंडित झाला. पावसामुळे वीज खंडित झाली असावी, असे वाटायला लागले.
वीज केव्हा येईल, अशी विचारणा वीज केंद्रांमध्येही व्हायला लागली. तेव्हा वीज केंद्रांमधील कर्मचाऱ्यांनाही नेमके काही सांगता येत नव्हते. खंडित झालेल्या वीजपुरवठ्याबाबत माहिती घेतली असता दाेंडाईचा येथील मुख्य केंद्रावरून वीज बंद झाल्याचे समजले. नंदुरबार शहरासह जिल्ह्याला दाेंडाईचा येथूनच वीजपुरवठा केला जाताे. नंदुरबार जिल्ह्यातील १२ वीज केंद्रांना वीज पुरविली जाते. तिथून विजेचा शहरासह जिल्ह्यात पुरवठा केला जाताे.

शिंदखेडा तालुक्यातील दाेंडाईचा येथून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाताेंडा केंद्रासह सर्व १७ केंद्रांवरील वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे सायंकाळी वाजेपासून शहरात विजेअभावी माेठी समस्या निर्माण झाली. त्यातच पावसाला सुरुवात झाल्यामुळे विजेच्या समस्येत पावसाचीही भर पडल्याचे दिसून अाले.

नंदुरबारमध्ये पावसाची हजेरी
जिल्ह्यातील बहुतांश भागात सोमवारी पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली. नंदुरबार शहरासह परिसरात साेमवारी सकाळपासून पावसाची रिपरिप होती. त्यानंतर दुपारी तीन ते चार वाजेनंतर पावसाचा जोर वाढला. मेघगर्जनेसह पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले हाेते. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाअभावी पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली होती. त्याचबरोबर खरीप हंगामही संकटात सापडला होता. त्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, धडगाव, तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील काही भाग, तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.

कर्मचाऱ्यांना माहितीच नाही काय झाले
वीजपुरवठा नेमका कशामुळे खंडित झाला वीज केव्हा येईल, याची माहिती शहरातील वीज केंद्रांमधील कर्मचाऱ्यांना नव्हती, असे दिसून अाले. अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता दाेंडाईचा येथे बिघाड झाल्याचे समजले.

शहर अंधारात
वीजपुरवठाखंडित झाल्यामुळे शहर अंधारात असल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. वीज नसल्याचा फटका अनेक अास्थापनांना बसला. सायंकाळी गुल झालेली वीज केव्हा येईल, याची शाश्वती नसल्यामुळे शहरातील नागरिक विचारण करताना दिसून अाले.

कामाला तातडीने सुरुवात
वीज काेसळल्यामुळे कंपनीच्या टाॅवरचे नुकसान झाले अाहे. टाॅवरचे काम करण्यासाठी तातडीने कर्मचारी पाठविण्यात अाले अाहेत. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण हाेऊ शकते. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. अनिल पाटील, कार्यकारी अभियंता
बातम्या आणखी आहेत...