आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन फीडर भारनियमनमुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - वीज वितरण कंपनीने मुंबई मुख्यालयात पाठविलेल्या प्रस्तावानुसार चारपैकी दोन फीडरवर भारनियमनमुक्तीचा निर्णय झाला. यापैकी एक्सप्रेस-1 फीडरवर निर्णयाची अंमलबजावणी झाली असून सोमवार (दि.9)पासून टाऊन फीडरही भारनियमनमुक्त होणार आहे. नुकत्याच झालेल्या या निर्णयामुळे शहरातील सुमारे 80 टक्के भाग भारनियमनमुक्त झाला आहे.

कमी झालेली वीजगळती आणि वाढलेल्या वीजबिल वसुलीमुळे वीज वितरण कंपनीने शहरातील एक्स्प्रेस वन, आरएमएस कॉलनी, भुसावळ टाऊन आणि जोगलखेडा हे चार फीडर भारनियमनमुक्त करावे, असा प्रस्ताव 25 ऑक्टोबरला मुंबई मुख्यालयात पाठवला होता. महिना उलटूनही प्रस्तावावर निर्णय न झाल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते. यासंदर्भात पालकमंत्री संजय सावकारे यांनी वीज वितरणच्या वरिष्ठांची कानउघाडणी करताच प्रस्तावावर स्वाक्षरी झाली. परिणामी एक्स्प्रेस वन आणि टाऊन फीडरवर भारनियमन बंदचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, उशिरा का होईना शहरात भारनियमनमुक्तीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे.

भुसावळ शहरात वीज गळती कमी होऊन थकबाकी वसुलीचे प्रमाण वाढले. नवीन उपकेंद्र सुरू झाल्यावर गळतीचे प्रमाण अजून कमी होईल. ग्राहकांनी थकबाकी वेळेत भरून वीजचोरी थांबविण्यासाठी सहकार्य करावे. आम्ही सवरेत्तम सेवा देण्यास बांधील आहोत. सर्वच फीडरवरील भारनियमन बंद झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता, वीज वितरण कंपनी

संपूर्ण भुसावळ शहर वीज भारनियमनमुक्त होईल. नवीन उपकेंद्राचे काम पूर्णत्वाकडे आहे. खडकारोड भागात गळती कमी करण्यासाठी स्पॉट मीटर योजना राबवली. भारनियमनमुक्तीच्या प्रस्तावातील तांत्रिक अडचणी दूर करून सकारात्मक निर्णय घेतला. उर्वरित फीडरवर येत्या 15 दिवसात भारनियमनमुक्तीचा निर्णय होईल. तसा पाठपुरावा केला आहे. संजय सावकारे, पालकमंत्री, जळगाव