आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गलथान कारभार: वीज मीटर बसवूनदेखील बिलांसाठी प्रतीक्षा कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वीजचोरी थांबवण्यासाठी गळती असलेल्या भागात मीटर बसवण्याची मोहीम राबवून क्रॉम्प्टनने वीजचोरीवर नियंत्रण आणले आहे. मात्र, ग्राहक वीजबिल भरण्यासाठी पुढे येत असताना त्यांना वेळेत बिले मिळत नसल्याची स्थिती आहे. या प्रकारातून क्रॉम्प्टनचा गलथान कारभार समोर आला आहे.

शहरातील हरिविठ्ठलनगर व राजीव गांधीनगरसह विविध भागातील हजारो वीज ग्राहकांना बिले मिळालेली नाहीत. एकीकडे क्रॉम्प्टनची वसुली मोहीम सुरू आहे, तर दुसरीकडे बिलांसाठी ग्राहकांची भटकंती सुरू आहे. फ्रॅँचाइजीनंतर तीन वर्षांत क्रॉम्प्टनने शहरातील वीजगळतीवर लक्ष केंद्र करीत वीजचोरी होणार्‍या भागातील आकडे काढून मीटर लावण्यासाठी ग्राहकांना जनजागृती व प्रबोधन करून सांगितले. तसेच समतानगर, हरिविठ्ठलनगर, जैनाबाद व जुने जळगावसह विविध भागात आर्मेड केबल टाकून वीजचोरी रोखली. त्याचबरोबर कॅम्प घेऊन वीजमीटरही तत्काळ बसवून दिले. वीजचोरीची मानसिकता बदलवण्यात क्रॉम्प्टनला यश आले असले तरी, बिले भरण्यास तयार असलेल्या ग्राहकांपर्यंत बिल पोहोचवण्यात मात्र कंपनी अपयशी ठरली आहे.