आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळालेल्या उपकरणांसह वीज कार्यालयावर धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील शविदत्तनगर, प्रल्हादनगर, गुर्जर काॅलनी या भागात घरगुती वीज उपकरणे जळाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. अचानक वीज दाब वाढल्याने उपकरणांचे नुकसान झाले. यामुळे नागरिकांनी गुरुवारी तापीनगर भागातील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठून नुकसान भरपाईची मागणी केली. नागरिकांनी नुकसान झालेले टीव्ही संच, फ्रीज अशी उपकरणेही सोबत आणली होती. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आश्वासन दिल्याने संतप्त नागरिक शांत झाले.

शहरातील शविदत्तनगर, प्रल्हादनगर, गुर्जर कॉलनी या विस्तारित भागात बुधवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास अचानक वजिेचा दाब वाढला. यामुळे या भागातील अनेकांचे टीव्ही संच, फ्रीज, कुलर, इन्व्हर्टर, वाॅशिंग मशीन, मोबाइल अशा उपकरणांचे नुकसान झाले. यामुळे नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. मात्र, वीजवाहिनीच्या अर्थिंगची तार तुटल्यामुळे हा प्रकार घडल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या स्पष्टिकरणामुळे नुकसानग्रस्त नागरिकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी तापीनगरातील वीज वितरणचे कार्यालय गाठले. पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, विनोद निकम यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विलास नवघरे यांची भेट घेऊन समस्या मांडली. २४ तासांत नुकनानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. भरपाई दिल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. या वेळी नुकसानग्रस्त नागरिकांनी नुकसान झालेली उपकरणेही कार्यालयात आणली होती. प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पंचनामे करण्याचे आश्वासन, वीज कंपनीच्या अभियंत्यांनी दिले.

^उपकरणांच्या नुकसानीबाबत वस्तुनिष्ठ पंचनामा करून वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवला जाईल. तसेच अचानक वीज दाब का वाढला, याची चिकित्सकपणे चौकशी करू. विलास नवघरे,
अतिरिक्त कार्यकारी वीज अभियंता
२४ तासांत नागरिकांना नुकसान भरपाई मिळाल्यास वीज कार्यालयाबाहेर ठिय्या मांडणार. नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही. जगनसोनवणे, जिल्हाध्यक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी

अवाजवी बिल : वीजउपकरणांचे नुकसान झालेल्या भागात अवाजवी बिल आकारणी केली जात असल्याची तक्रारही नागरीकांनी केली. तसेच वेळी-अवेळी होणाऱ्या भारनियमनाचा मुद्दाही नागरिकांनी या वेळी उपस्थित केला.

आंदोलनाचापवित्रा : नुकसानग्रस्तांनीसंताप व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र,अभियंत्यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने, नुकसानग्रस्तांसह पीआरपी पदाधिकाऱ्यांनी त्या वेळी नरमाईची भूमिका घेतली.

भ्रमणध्वनी बंद ठेवल्यास दंड
संबंधितविभागातील वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी वीज वितरणने कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनी दिला आहे. मात्र, हा भ्रमणध्वनी कर्मचाऱ्यांनी बंद ठेवल्यास, त्यांना एक हजार रुपये दंड करण्याची तरतूद आहे. तक्रार नोंदवण्यासाठी असलेला भ्रमणध्वनी बंद येत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यास, कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली. गेल्या दाेन आठवड्यांपासून तक्रारी वाढल्या आहेत.