आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेचा संताप कार्यालयांवर काढला; खुर्च्या फेकल्या, कुलरचीही ताेडफाेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - वादळामुळे झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर वीज गूल झाली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी वीज कंपनीच्या रामवाडी माेगलाई येथील कार्यालयांमध्ये ताेडफाेड केली. यात खुर्च्यांची फेकाफेक तसेच माेडताेड केली. टेबलही भिरकावले. तसेच कर्मचाऱ्यांना काेयता लावून धमकावले. विजेच्या फांद्या पडून तारा तुटल्याने वीज कंपनीचे ११ लाख रुपयांचे नुकसान झाले. शहरात २४ तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. 
 
शहरात काल शुक्रवारी सायंकाळी जाेरदार वादळ अाले. यात झाडांच्या फांद्या तुटल्या. या फांद्या विजेच्या तारांवर काेसळल्या. वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्ही आणि ११ केव्हीच्या वीज वाहिन्यांवर ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याने शहरातील किमान ७५ टक्के भागात पावसानंतर वीजपुरवठा खंडित झाला. या वेळी विजेची दुरुस्ती करायला कर्मचारी गेले. त्यामुळे दूरध्वनीही काेणी उचलत नव्हते. याचाच नागरिकांना राग अाला. संतापाच्या भरात रामवाडी आणि मोगलाई परिसरातील वीज कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड करण्यात आली. तसेच या वेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आले. तर देवपुरात वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोयता दाखवत धमकावण्यात आले. वीज कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी पी.एच. मचिये, सहायक अभियंता पी.एल. गवळी, बी.आर. वराडे यांनी तातडीने बैठक घेऊन पाऊस थांबल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी किरकोळ दुरुस्ती आहे. त्या ठिकाणांना प्राधान्य देत तत्काळ दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. शनिवारी सायंकाळी २४ तासांनंतर शहरातील शंभर टक्के वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. या अवकाळी पावसात वीज कंपनीचे सरासरी ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या अापत्कालीन परिस्थितीत एम.डी. मोहिते, डी.जे. ठाकरे, डी.एल. धामणे, एम.डी. सैंदाणे, डी.एम. गावित, डी.एस. राहते, ए.एच. साळुंखे, गोपाल बावस्कर, योगेश पाटील, विलास माळी, ए.डी. चौधरी, नरेंद्र जाधव या पथकाने शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. शनिवारी दिवसभर वीजपुरवठा सुरळीत झालेला हाेता. 

काैटुंबिक वाद 
^रामवाडीमाेगलाईयेथे काही जणांनी ताेडाफाेड केली. मुळात सगळी यंत्रणा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत हाेती.कर्मचारी रात्रभर कामावर हाेते. ताेडफाेड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार अाहे. त्याची दखल घेतली अाहे. -पी.एच.मचिए,सहायक कार्यकारी अभियंता, वीज कंपनी 

रात्रभर चालले दुरुस्तीचे काम 
रात्रीवाजेपर्यंत वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वीज ठेकेदारांकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. रात्री ३:३० वाजेपर्यंत बहुतांश परिसरात वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला होता. ज्या ठिकाणी मोठी हानी झाली आहे अशा ठिकाणी शनिवारी सकाळीच कामांना सुरुवात करण्यात आली. दुपारी वाजेपर्यंत दत्त मंदिर परिसर, जिल्हा रुग्णालय, पोलिस मुख्यालय परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर प्रभातनगर परिसरातील विद्युत रोहित्र दुरुस्तीचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. 

 
बातम्या आणखी आहेत...