आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Electricity Production Shut Down From Bhusawal Project

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळच्या प्रकल्पातून वीजनिर्मिती प्रक्रिया ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दीपनगर वीजनिर्मितीच्या विस्तारित प्रकल्पातील दोन्ही वीजनिर्मिती संचांमध्ये शुक्रवारी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने वीजनिर्मितीची प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे या संचांमधून पुढील चार दिवस राज्याला वीज मिळण्यात अडचणी येणार आहेत. राज्याला उन्हाळ्यात अतिरिक्त विजेची गरज भासत असतानाच निर्माण झालेल्या या बिघाडाने तब्बल ८00 मेगावॅटची तुट निर्माण झाली आहे. दीपनगर विस्तारित केंद्रातील 500 मेगावॅट स्थापित क्षमतेच्या वीजनिर्मिती संचाच्या बॉयलर ट्यूबमध्ये 22 मीटर अंतरावर ट्यूबलिकेज झाले. यामुळे या संचातून वीजनिर्मिती थांबविण्यात आली. संच क्रमांक चारमधील 20 ते 25 मीटर अंतरावर वारंवार बॉयलर ट्यूबलिकेज होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.