आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Project : Deepnagar Import Coal Close Down

विजनिर्मिती प्रकल्प : दीपनगरातील आयात कोळशाला ‘ब्रेक’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - दीपनगर विस्तारित वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा प्रचंड अभाव असल्याने वीजनिर्मिती खालावली आहे. आठ दिवसांपासून आयात कोळसा मिळाला नसल्याने केवळ एफ ग्रेडच्या कोळशावर मदार आहे. खराब कोळशामुळे एक हजार मेगावॉट स्थापित क्षमतेच्या विस्तारित प्रकल्पातून केवळ 250 मेगाव्ॉट वीज मिळते.

महाजनको कंपनीचा विस्तारित प्रकल्प तब्बल अडीच वर्ष उशिराने सुरू झाला. 500 मेगाव्ॉट क्षमतेच्या संच क्रमांक चारची सीओडी चाचणी पूर्ण करण्यात आली. यानंतर आता संच पाचची सीओडी चाचणीदेखील अंतिम टप्प्यात असतानाच तांत्रिक बिघाड झाला. यामुळे सीओडी चाचणी रखडली आहे. दुसरीकडे प्रकल्प कार्यान्वित झाला असताना कोळशाचा तुटवडा मात्र कायम आहे. महाजनको कं पनीकडून डब्ल्यूसीएलकडे वारंवार कोळशाची मागणी केली जाते. या मागणीकडे दुर्लक्षच होत आहे. नवीन लोहमार्गावरून आठवडाभरात तीन रॅक कोळसा मिळाला. मात्र, हा कोळसा एफ ग्रेडचा असल्याने त्यात 20 टक्के आयात कोळसा मिसळल्याशिवाय वीजनिर्मितीचा उच्चांक वाढत नाही. गेल्या आठ दिवसांपासून आयात कोळसादेखील न मिळाल्याने केवळ एफ ग्रेडच्या कोळशावरच जेमतेम 250 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. राज्यात विजेची मागणी वाढल्याने आयात कोळशाचा पुरवठा गरजेचा आहे.


कोळसा गरजेचा
आयात कोळसा मिळाल्यास वीजनिर्मितीचा उच्चंक वाढतो. अधिक उष्मांकामुळे वीजनिर्मितीचे कामही सुलभ होते. उन्हाळ्यात विजेची गरज असताना निकृष्ट कोळसा मिळत आहे. आर. व्ही. तासकर, उपमुख्य अभियंता, दीपनगर