आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Rate To Mislead About The Construction: Dotonde

वीज दराबाबत गैरसमज निर्माण : दोतोंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महावितरणकडून वारंवार स्पष्ट करूनही दरवाढ आणि दरकपातीबाबत ग्राहक संघटनांकडून संभ्रम व गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नव्याने लागू करण्यात आलेले वीजदर हे एप्रिल 2013मध्ये लागू करण्यात आलेल्या दरांच्या समपातळीवर असतील. त्यामुळे ग्राहकांनी दरवाढ व दरकपातीबाबतची वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी माहिती महावितरणचे महाव्यवस्थापक (सांघिक संवाद) राम दोतोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कर्जामुळे दरवाढ अटळ
राज्य 84 टक्के भारनियमन मुक्त आहे व ही वस्तुस्थिती आहे. राज्यात वीजपुरवठा हा जानेवारीत 14 हजारांवरून 16 हजार मेगाव्ॉटपर्यंत पोहोचला आहे; त्यामुळे विजेची कमतरता नाही. मात्र, थकबाकीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात असल्याने वीजनिर्मितीसाठी लागणार्‍या खर्चापायी झालेल्या कर्जाचा डोंगर महावितरणवर आहे. परिणामी थकबाकी वाढल्याने यातून कटू कारवाई व भारनियमन करावे लागत आहे. याशिवाय दोन वर्षात झालेल्या विलंबामुळेही महावितरणवर 1300 कोटी रुपयांचा बोजा पडलेला आहे.
या सर्वांपोटी महावितरणने आयोगाकडे एकूण 9226 कोटी रुपयांची दरवाढ मागितली आहे. 20 टक्के दरकपातीच्या फरकापोटी शासन दरमहा 606 कोटी आणि महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांनी मिळून दरमहा 100 कोटी रुपये महावितरणला देणार आहेत. या अर्थसाहाय्यासाठी विद्युत नियामक आयोगाची परवानगीही आवश्यक आहे. मंजुरीसाठी महावितरणने याचिकाही दाखल केली आहे.
फ्रँचायझींवर ठेवणार नियंत्रण
राज्यातील फ्रँचायझी असलेल्या पुरवठादार कंपनीबाबत वीजपुरवठा व विलंबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर नोडलचे नियंत्रण आवश्यक आहे. परिणामी ग्राहकांमध्ये खासगी वीज कंपन्यांबाबत संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे यापुढे फ्रँचायझी दिलेल्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. खासगी कंपनीसोबत महिन्याला बैठका घेऊन ग्राहकांच्या तक्रारीस कंपनीच्या ध्येय धोरणांवर नियंत्रण ठेवले जाणार असल्याचेही दोतोंडे यांनी सांगितले. मुख्य अभियंता प्रसाद रेशमे, अधीक्षक अभियंता अशोक शिंदे, अविनाश साखरे उपस्थित होते.