आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Electricity Substation,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डी-मार्टसमोरील वीज उपकेंद्रात संतप्त नागरिकांचा गोंधळ, नवरात्रोत्सवात सायंकाळी वीजपुरवठा खंडित केल्याचा राग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सणासुदीच्याकाळात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवल्याच्या कारणावरून शिरसोली रस्त्यावरील डी-मार्टसमोरील वीज मंडळाच्या उपकेंद्रात सुमारे २०० नागरिकांच्या संतप्त जमावाने सोमवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास गोंधळ घातला.
या उपकेंद्रावरून मेहरूण तांबापुरा भागात वीजपुरवठा केला जातो. मात्र, दोन दिवसांपासून या भागात दुपारी 3. 30 ते सायंकाळी 7.30 या वेळेत भारनियमन केले जात आहे. दुर्गोत्सवाच्या काळात शासनाने रात्रीचे भारनियमन बंद केले असूनही वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे रामेश्वर कॉलनीसह मेहरूण तांबापुरा भागातील नागरिकांनी उपकेंद्रावर मोर्चा नेऊन दोन सुरक्षारक्षक ऑपरेटरला धक्काबुकी केली. तसेच उपकेंद्रावरील वीजपुरवठाही बंद पाडला.
याबाबत माहिती मिळताच औद्योगिक वसाहत रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवून तणाव दूर केला. मात्र, रात्री वीजपुरवठा बंद ठेवल्यास तोडफोड करण्याचा इशारा या नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, विजेची उपलब्धता कमी झाल्याने गळती अधिक असलेल्या भागात चार तासांचे भारनियमन करण्याचे आदेश महावितरण कंपनीकडून मिळाले अाहेत. त्यानुसार भारनियमन केले जात आहे, अशी माहिती क्रॉम्प्टनच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी यासंदर्भात नागरिकाची बैठक घेतली जाणार आहे.