आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजचोरी केल्यास जळणार घरातील उपकरणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वीजचोरीया सारख्या गंभीर समस्येवर उपाययोजना म्हणून‘इलेक्ट्रिसिटी थेप्ट बाय फ्रिक्वेन्सी’ नावाचे उपकरण एसएसबीटी अभियांत्रिकीच्या विद्युत अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. ज्या खांब्यावर हे उपकरण बसवले जाईल त्या खांब्यावरून ज्या घरांमध्ये वीजपुरवठा गेला आहे. त्या घरात जर वीजचोरीचा प्रयत्न झाला तर घरातील विजेची उपकरणे जळतीत. सूर्यकुमार सिंह, पराग शेकोकर, नम्रता राजपूत, प्राची शिंपी यांनी हे ‘इलेक्ट्रिसिटी थेप्ट बाय फ्रिक्वेन्सी’ हे उपकरण एक पॅरलर इन्व्हर्टरही तयार केले आहे.

७० हजार कोटींच्या बचतीचा दावा
हेउपकरण तयार करणे शासनासाठी सोपे आहे. तसेच त्याचा खर्चही कमी आहे. मात्र, या उपकरणाच्या वापरामुळे एका वर्षात भारतात ७० हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे. ग्रामीण भाग मोठ्या शहरांमध्ये या उपकरणाचा उपयोग जास्त करता येईल. देशभरात वापरल्या जाणा-या विजेच्या तुलनेत सुमारे ३० टक्के वीजचोरी होत असते, त्या आकड्यांवरून विद्यार्थ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

काय आहे उपकरणात ?
यासखांब्यावर बसवावे लागेल. त्यानंतर खांबावरून ज्या घरांमध्ये वीजपुरवठा गेला आहे. त्या घरांमध्ये वीजचोरी करण्याचा प्रयत्न केल्यास घरातील विजेची उपकरणे जळून जातील. कारण या उपकरणात ‘इंडियन स्टॅण्डर्ड ५० एचझेड फ्रिक्वेन्सी’च्या प्रवाहात १०० एचझेडपर्यंत वाढ केली आहे. घरातील जी उपकरणे ५० एचझेडपर्यंतच्या फ्रिक्वेन्सीत काम करतात, तीच चालू शकतील. इतर उपकरणे आपोआपच जळून जातील. यासाठी विद्युत विभागाचे प्रमुख डॉ. परेश शाह, एम.एम.अन्सारी, व्ही.एस.पवार, एस.एम.शेंभेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

इलेक्ट्रिसिटी थेप्ट बाय फ्रिक्वेन्सी उपकरण.

विद्यार्थ्यांनीतयार केलेल्या या उपकरणाला १५ हजार रुपये खर्च आला आहे. त्याच्या प्राथमिक चाचण्या झाल्या आहेत. वीजचोरी रोखण्याचे काम हे उपकरण करीत आहे. डॉ.परेश शाह, विभागप्रमुख, विद्युत अभियांत्रिकी

बातम्या आणखी आहेत...