आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री वीज चोरांचे फोटो काढून दिवसा केल्या धडक कारवाया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - रात्रीच्या सुमारास वीजचोरी होत असलेल्या ठिकाणांचे छायाचित्रे काढायची. त्यानंतर दिवसा तसेच सायंकाळी अचानक छापा टाकून कारवाई करायची, असे सत्र वीज कंपनीच्या भरारी पथकाने हाती घेतल्यामुळे वीजचोरांना दणका बसला आ हे. शहरातील वीज कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना थांगपत्ता लागू देता कल्याण नाशिकच्या पथकांनी शहरात धडक कारवाई केली. यात तब्बल आ ठ लाखांची वीजचोरी पकडण्यात आ ली. तसेच ३३ जणांवर कारवाई करण्यात आ ली. या छापासत्रातून शहरातील वीजचोरीला ऐन थंडीच्या काळात काही प्रमाणात तरी आ ळा बसणार आहे.

शहरात वीजचोरीचा मुद्दा आ ला की, अधिकारी झोपडपट्टी तसेच स्लम एरियात वीजचोरी होत असल्याची कारणे पुढे करतात. यातून त्या भागांमध्ये जास्तीचे भारनियमनही केले जाते. यात इतर वीजचोरी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र आ ता सभ्य समजल्या जाणाऱ्या वर्गातील वीजचोरी रोखण्याची तयारी वीज कंपनीने केली आ हे. मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयातील विशेष आदेशानुसार ३५ अधिकारी आ णि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पाच भरारी पथकांची विशेष नियुक्ती वीजचोरी पकडण्यासाठी करण्यात आली. त्यात कल्याण येथील दोन, नाशिक येथील एक धुळ्यातील दोन स्थानिक भरारी पथकांचा समावेश आहे. ते जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीत या भरारी पथकांनी शहरात धडक मोहीम राबविली. या धडक मोहिमेत चाळीसगाव रोड, देवपूर, वाडीभोकर रोड या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या धडक मोहिमेदरम्यान ३३ वीजचोऱ्या पकडण्यात आलेल्या आहेत. त्यात प्रथमदर्शनी आठ लाखांची वीजचोरी समोर आलेली आहे. दरम्यान दुसरीकडे मात्र अधिकृत बिलिंगची प्रक्रिया सुरू आहे. अधिकृत बिलिंग झाल्यानंतर वीजचोरीच्या रकमेत वाढ होणार आहे. एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया होण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष पथकाकडून रात्री रेकी करून दिवसा अकस्मात धाड टाकण्यात आल्याने वीजचोरांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. ज्या-ज्या ठिकाणी वीजचोरी उघड झाली अशा वीजचोर ग्राहकांना आतापर्यंत चोरलेले युनिट दंडाची रक्कम असे बिलिंग देण्यात येत आहे. जर दिलेले बिल भरण्यात आले नाही तर संबंधिताविरुद्ध वीज कायदा २००३च्या कलम १३५ नुसार नाशिक येथील विशेष पोलिस ठाण्यात नियमानुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. विशेष पथकांच्या कारवाईमुळे पांढरपेशा वीजचोरांचे धाबे दणाणले आहे. तर दुसरीकडे नियमानुसार वीजबिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांकडून मात्र या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव
शहरात कल्याण नाशिक येथील भरारी पथकांनी केलेल्या कारवायांमुळे राजकीय पुढाऱ्यांना चांगलाच हादरा बसला आहे. या कारवाईमुळे हादरलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी मात्र नेहमीप्रमाणे स्थानिक अधिकाऱ्यांवर आपल्या शैलीने दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, वीज कंपनीने ज्या भागातअिधक वीजचोरी त्या भागात जास्त भारनियमन करण्याचा निर्णय घेतला आहे.


अशा पद्धतीने होते वीजचोरी
शहरात राबवण्यात आलेल्या विशेष शोधमोहिमेत व्यक्तिपरत्वे वीजचोरीचे वेगवेगळे फंडे वापरण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यात रिमोटसह मीटरमध्ये छेडछाड करण्याबरोबरच एक्स-रे फिल्मचा वापर, चुंबकाच्या वापरासह बायपास वायर काढून वीजचोरी तसेच सामान्यांकडे सरळ आकडा टाकून वीजचोरी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. वीजचोऱ्या टाळण्यासाठी शहरातील काही भागात इन्सुलेटेड केबल टाकण्यात आली आहे.

वसुली करण्याचे आदेश
शहरातील वीजचोरी तसेच गळती रोखण्याबरोबरच वीजबिलांच्या वसुलीसाठी वीज कंपनीच्या लाइनमनवर विशेष मदार असते. यासंदर्भात कर्मचाऱ्यांना टार्गेट देण्यात आलेले आहे. तसेच वसुली झाली नाही तर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपातीचा फंडा राबवण्यात आला आ हे. त्यामुळे त्यांच्यावर दबाव आहे.

यापूर्वीही चोरी उघड
औद्योगिक वसाहतीत दोन महिन्यांपूर्वी वीजचोरी उघड झाली होती. या उद्योजकाने बायपास वायर टाकून चोरी केली होती. तर गेल्या वर्षी स्टेशन रोड परिसरातील डॉक्टरांसह अशोक नगर परिसरात एका व्यावसायिकाकडे वीजचोरी समोर आली होती. या दोन्ही चोरट्यांनी रिमोटच्या साहाय्याने वीजचोरी केल्याचे समोर आले आ हे.