आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव: घर, दुकान, कॉम्प्लेक्स अथवा कुठलेही उंच बांधकाम करताना त्या जागेवरून वीजवाहिनी गेली असल्यास, त्या ठिकाणी असलेल्या वीजवाहिनीवर पाइपचे कव्हर अथवा रबरी इन्सुलेशन लावण्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकार जेथे आढळेल, त्या ठिकाणी आता नोटीस बजावून कारवाई करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीने यासंबंधीचे आदेश परिमंडळांना दिले आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे नव्याने बांधकाम करणार्या नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.
जबाबदारी कंपनीवरच
शहरात जागोजागी वीजवाहिन्यांना लागून मोठय़ा प्रमाणात बांधकामे झालेली आहेत. अशा बांधकामांमुळे वीजवाहिनीतून विद्युतप्रवाह घरात उतरणे व घरातील व्यक्तींना विजेचा शॉक लागणे अशा घटनांसाठी सरळ वीज कंपनीला दोषी धरले जात असल्याचे कारण पुढे केले जात आहे. महावितरण कंपनीने एका परिपत्रकाद्वारे शहरातील आपल्या सर्व उपकेंद्रांतील कर्मचार्यांना बांधकामावरून गेलेल्या वीजतारांना कुठल्याही प्रकारचे पाइप अथवा रबरी इन्सुलेशन लावू देऊ नये व अशी मागणी करणार्या नागरिकांना नोटीस बजावून कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
दरम्यान, शहरामध्ये बर्याच ठिकाणी वीजवाहिनीजवळ किंवा खाली निवासी घर, दुकान आदी विनापरवानगी बांधकाम होते. या ठिकाणी वीजवाहिनीचे पहिल्यापासूनच अस्तित्व असते आणि बांधकामाबाबत वीज वितरण कंपनीला कोणत्याही माध्यमातून कळविले जात नाही. अशा ठिकाणी दुर्घटना होऊन जीवित अथवा वित्तहानी झाली, तर मात्र वीज कंपनीला नाहक जबाबदार धरले जाते. त्यामुळे कंपनीची प्रतिमा मलिन होत आहे. वीजवाहिनी उभारणी आणि निवासी बांधकामाबाबत भारतीय विद्युत नियम 1956नुसार सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे; मात्र वीजवाहिनीपासून सुरक्षित अंतर राखून बांधकाम केले जात नाही. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडतात. विद्युत नियमांचे पालन केल्यास अपघात टळू शकतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.