आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electronic Election Machine Going To Madhya Pradesh

मध्य प्रदेशमध्ये पाच हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे रवाना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- येत्या नोव्हेंबरमध्ये होणार्‍या मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा संच पाठवण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवारी मतदान व कंट्रोलची मिळून चार हजार 910 यंत्रे रवाना झाली असून, आणखी काही यंत्र पाठवण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने मध्य प्रदेशच्या प्रशासकीय अधिकार्‍यांकडे ही यंत्रे सुपूर्द केली.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ व जळगाव येथील यंत्रे मध्य प्रदेश प्रशासनाकडे देण्यात आली आहेत. ही यंत्रे घेऊन जाण्यासाठी मध्य प्रदेशचे प्रशासकीय अधिकारी पोलिस बंदोबस्तासह जिल्ह्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 4,910 यंत्रे मंगळवारी रवाना झाली. ही यंत्रे ग्वाल्हेर, शिवपुरी, दातिया, सागर व बडवाणी येथे पाठवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहार विधानसभेच्या निवडणुकांसाठी मध्य प्रदेशातून यंत्रे पुरवण्यात आली होती, तर मध्य प्रदेशाला महाराष्ट्रातील यंत्रे पुरवली जात आहेत. नोव्हेंबरमध्ये निवडणूक झाल्यानंतर सहा महिने हलवता येणार नसल्याने जुलैपर्यंत ही मतदान यंत्रे तेथेच राहतील.