आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Elephant Standing At Satpura Forest In 18th Century

वन्यजीव सप्ताह विशेष: सातपुड्यात होते हत्तींचे अस्तित्व, तथ्य शोधण्यासाठी अभ्यास हवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- सुमारे ५० हजार वर्षांपासून ते अलीकडील १८व्या शतकापर्यंत खान्देशातील सातपुड्यात हत्तींचे वास्तव्य होते. यावर आपला चटकन विश्वास बसत नसला तरी १८८०च्या खान्देश गॅझेटिअरमध्ये तशी नोंद आहे. मात्र, जंगलतोड, कमी झालेल्या कुरणांमुळे हत्तींनी इतरत्र स्थलांतर केले. हत्ती आणि चित्ता या प्राण्यांचा सहवास संपुष्टीसोबतच खान्देशातील सातपुड्याची दुर्दशा सुरू झाली.

जगभरात हत्तींच्या वाढलेल्या शिकारी आणि पृथ्वीतलावर या प्राण्याला निर्माण झालेल्या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी पाच वेगवेगळ्या उपखंडामधील दीडशे देशांमध्ये शनिवारी "एलिफंट मार्च' निघाले. या पार्श्वभूमीवर कधीकाळी सातपुड्यात अस्तित्व असलेल्या हत्ती अधिवासाच्या विषयावरील धूळ झटकली गेली आहे. "सातपुडा आणि हत्ती' हा विषय आता भूतकाळ झालेला असला तरी त्यामागील कारणांचा उहापोह गरजेचा आहे.
पूर्वी दक्षिण भारतातील हत्तींचे कळप उत्तरेतील हिमालयाकडे स्थलांतर करायचे. या वेळी काही
हत्ती सातपुड्याकडे वळायचे विदर्भापासून सुरू होणारा सातपुडा पुढे खान्देशातून गुजरातमधील डांगपर्यंत जातो. या भागात हत्तींचा वावर असल्याचा अंदाज पूर्वी जमिनीवरील लढाई, वन्यप्राण्यांच्या िशकारींसाठी हत्तींचा वापर होत असे. नंतर मात्र हत्तीच शिकारींचे बळी ठरायला लागले
भारतात हत्तीला धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व असले तरी जगभरात दरवर्षी ३५ हजार हत्तींचे शिरकाण केले जाते.

दाव्याला पुष्टी
१७व्या शतकापर्यंत सातपुड्यातील काही भागात हत्तींची पैदास सुद्धा होत असावी. १८व्या शतकापासून हत्ती नामशेष झाले. खान्देश गॅझेटिअर (१८८०) मधील नोंदीनुसार सातपुड्यात हत्ती वाघ असल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळते.
-सुरेंद्र चौधरी, सदस्य, सातपुडा बचाव कृती समिती, भुसावळ

हत्तींचा वावर होता
बारकाव्याने अभ्यास केल्यास खूप पूर्वी सातपुड्यात हत्तींचा वावर होता, असे ठोसपणे म्हणता येईल. गॅझेटिअरमध्ये सुद्धा तसा उल्लेख आहे. मात्र, बदलती भौगोलिक स्थिती, वृक्षतोडीमुळे त्यांनी स्थलांतर केले असावे.
-अभय उजागरे, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक, जळगाव

अभ्यास हवाच
सातपुडापर्वत राजी आणि वन्यजीवांचा अधिवास याबाबत अधिक सखोलतेने अभ्यास अपेक्षित आहे. कधीकाळी हत्ती आणि चित्त्यांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या सातपुड्याचे आताचे स्वरूप मात्र काळजीत टाकणारे असेच आहे. -मिलिंद भारंबे, आजीव सदस्य, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसा.

रेड बुक'मध्ये नोंद
महाराष्ट्रातपूर्वी हत्ती होतेच, असा कोलकाता येथील झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या "रेड बुक'मध्ये उल्लेख आहे. आता हत्तींचे अस्तित्व असलेल्या भागांच्या तुलनेत, मध्य भारतात पोषक वातावरण नसल्याने हत्तींनी इतरत्र स्थलांतर केले असावे.
- हेमंत छाजेड, एसीएफ, नाशिक

हत्तींच्या स्थलांतराचे कारण
निसर्ग साखळीतील महत्त्वाचा प्राणी असलेल्या हत्तींच्या अधिवासासाठी गवताळ प्रदेश लागतो. मात्र, मध्य प्रदेशातील सेंधवा ते बऱ्हाणपूर आणि जळगावमधील रावेर, यावल, चोपडा या बेल्टमधील सातपुड्यात झाडोऱ्याचे जंगल आहे. सुमारे ५० हजार वर्षे जुने असलेले हे जंगल "उच्च कोटीचे' म्हणून गणले जाते. येथे कधीकाळी हत्तींचे अन्न असलेल्या उंच गवताची कुरणे होती. मात्र, झाडोरा वाढत गेल्याने कुरणे नाहीशी झाली. परिणामी हत्तींनी इतरत्र स्थलांतर केले.